मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसात कमी होईल सुटलेले पोट आणि वजन, फक्त फॉलो करा हे डायट प्लॅन

Weight Loss: चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसात कमी होईल सुटलेले पोट आणि वजन, फक्त फॉलो करा हे डायट प्लॅन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2023 07:48 PM IST

Chaitra Navratri: जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करत असाल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही योग्य डायट प्लॅन फॉलो करा. येथे पहा डायट प्लॅन आणि काही टिप्स.

नवरात्रीच्या ९ दिवसात वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन
नवरात्रीच्या ९ दिवसात वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन

Navratri Weight Loss Diet Plan: चैत्र नवरात्रीला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान लोक ९ दिवस उपवास करतात. अशा परिस्थितीत, ही एक चांगली वेळ आहे जेव्हा तुम्ही वजन कमी करू शकता आणि आपले शरीर डिटॉक्स देखील करू शकता. मात्र, योग्य आहाराची माहिती नसल्याने नवरात्रीच्या काळात काहींचे वजन वाढते. काही लोक या उपवासात दिवसभर उपवास करतात आणि नंतर रात्री तुपात बनवलेल्या अन्नाने उपवास सोडतात, हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. नवरात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा डाएट प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही पोट आणि वजन दोन्ही कमी करू शकाल. हा डाएट फॉलो करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहा डायट प्लॅन आणि काही टिप्स

ही चूक करू नका

नवरात्रीच्या उपवासात वजन कमी करायचे असेल तर काही गोष्टी पूर्णपणे टाळा. उपवासाच्या वेळी वेट लॉस डायट प्लॅनमध्ये कुट्टूची पुरी आणि बटाटा चिप्स खाऊ नका. ते वजन वाढवू शकतात. उपवास करताना जेवण स्किप करु नका. यामुळे दिवसभर चालण्याऐवजी सकाळी लवकर फिरायला जा.

नवरात्रीत कसे करावे वेट लॉस

पहिला दिवस

नाश्ता - बदामाच्या दुधासह भाजलेले मखाना

मिड मॉर्निंग - नारळाचे पाणी

दुपारचे जेवण - पनीर आणि कुट्टूची पोळी

संध्याकाळ - फ्रूट चाट

डिनर- कमी तूपातील पालकाची भाजी आणि उकडलेले बटाटे

 

दुसरा दिवस

नाश्ता - केळीचा शेक (चिया सीड्ससोबत)

मिड मॉर्निंग - नारळाचे पाणी

दुपारचे जेवण - फळांचा रायता

संध्याकाळ - काकडीची कोशिंबीर किंवा रायता

रात्रीचेजेवण - तुपाशिवाय कुट्टूची भाकरी आणि दही

 

तिसरा दिवस

नाश्ता - कुट्टूचा चीला

मिड मॉर्निंग - नारळाचे पाण्याचे

जेवण - उकडलेले बटाट्याचे सॅलड आणि दही किंवा भाजी

संध्याकाळ – काकडी रायता

रात्रीचेजेवण – स्ट्रॉबेरी आणि केळी शेक

चौथा दिवस

नाश्ता- शिंगाड्याची इडली

मिड मॉर्निंग- फळे

दुपारचेजेवण- भगर

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- दुधी भोपळ्याची भाजी आणि दही

 

पाचवा दिवस

नाश्ता – पपई शेक

मिड मॉर्निंग – लिंबू पाणी आणि एक फळ

दुपारचेजेवण – भाज्यांनी बनवलेली साबुदाणा टिक्की आणि दही

संध्याकाळ - ग्रीन टी

डिनर – भाज्यांची कोशिंबीर

 

सहावा दिवस

नाश्ता - पनीरने भरलेला कुट्टू चीला

मिड मॉर्निंग- नारळ पाणी

दुपारचे जेवण- वरईचा भात किंवा भगर

संध्याकाळी - ग्रीन टी

रात्रीचे जेवण- पनीरसोबत काही भाज्य

सातवा दिवस

नाश्ता - कट्टूचा डोसा

मिड मॉर्निंग- नारळ पाणी

दुपारचे जेवण - कट्टूच्या पीठाची पोळी आणि रायता

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- दूध आणि काही फळे

 

आठवा दिवस

नाश्ता - साबुदाणा खिचडी

मिड मॉर्निंग - फ्रूट चाट

लंच- तेल शिवाय बनवलेले पालक पनीर

संध्याकाळ- ग्रीन टी

डिनर- वरईचा भात

 

नववा दिवस

नाश्ता - बदाम असलेली मखाना खीर

मिड मॉर्निंग - संत्र्याचा रस

दुपारचे जेवण - अननस आणि डाळिंब रायता

संध्याकाळ - ग्रीन टी

डिनर - रताळे चाट

या गोष्टींची काळजी घ्या

भरपूर पाणी प्या: यावेळी ताक, नारळ पाणी यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

भरपूर भाज्या खा: उपवासाच्या वेळी खाऊ शकणार्‍या भाज्यांचा आहारात समावेश करा. मात्र बटाटे कमीत कमी खा.

हलका व्यायाम : उपवासात जेवल्यानंतर एकाच जागी बसल्याने देखील वजन वाढू शकते. त्यामुळेच तुम्ही दिवसभरात एकाच वेळी हलके वॉक करू शकता. सकाळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करा.

हेल्दी स्नॅक्स: उपवासात नमकीन आणि चिप्ससारखे अनेक प्रकारचे स्नॅक्स बाजारात मिळतात. पण ते खाणे टाळा. मधेच भूक लागल्यास भाजलेला मखाना आणि चिप्स खाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग