मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: 'हे' फूड कॉम्बिनेशन करतील तुमच्या वजन कमी करण्याच्या प्लॅनिंगचा सत्यानाश!
वेट लॉस मिस्टेक
वेट लॉस मिस्टेक

Weight Loss: 'हे' फूड कॉम्बिनेशन करतील तुमच्या वजन कमी करण्याच्या प्लॅनिंगचा सत्यानाश!

19 March 2023, 14:11 ISTHiral Shriram Gawande

Weight Loss Mistakes: वजन कमी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असाल आणि हे फूड कॉम्बिनेशन एकत्र खात असाल तर सावध व्हा. हे तुमच्या वेट लॉस जर्नीवर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे तुमचे वजन वाढते.

Bad Food Combination for Weight Loss: वजन कमी करणे हे खूप अवघड काम आहे. नियंत्रित आहार, व्यायामाबरोबरत तुमचा आहार योग्य असणे देखील महत्त्वाचे आहे. असं असलं तरी जास्त वजनामुळे आजकाल अनेक आजार होत आहेत. ज्यामध्ये हृदयरोगांपासून फॅटी लिव्हरपर्यंतच्या परिस्थितींचा समावेश आहे. अशावेळी प्रत्येकजण वजन कमी करण्याचा विचार करतो. जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि तरीही इच्छित परिणाम मिळत नाही, अशा वेळी आपल्या आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण अनेकदा काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने वजन वाढतं.

ट्रेंडिंग न्यूज

केळी आणि दूध खाऊ नये

जर आपण वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर कधीही केळी आणि दूध एकत्र खाण्याचा प्रयत्न करू नका. कारण हा फॉर्म्युला फक्त वजन वाढवणाऱ्यांसाठीच काम करतो. जर तुम्ही निरोगी आणि पौष्टिक आहारामुळे केळी घेत असाल तर दूध प्यायल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासानंतर केळी खा.

जेवल्यानंतर लगेच डेझर्ट खाणे

अनेकांना जेवण झाल्यानंतर लगेचच जेवणाच्या ताटात मिठाई, डेझर्ट हवे असते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक निरोगी पर्याय निवडतात. मात्र वजन कमी करण्यात व्यस्त असाल तर जेवण केल्यानंतर लगेचच डेझर्ट पूर्णपणे टाळा. याचे कारण म्हणजे अन्नाने भरलेले आपले पोट जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता तेव्हा आतड्यांवरही अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे डेझर्ट खाण्यासाठी सुमारे अर्धा तास थांबावे.

चहासोबत स्नॅक्स

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यासोबत काही स्नॅक्स खाण्यास सुरुवात करता. वैज्ञानिकदृष्ट्या हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण चहामध्ये आढळणारे कॅफिन आणि टॅनिन अन्नासोबत मिसळून आम्लपित्त आणि सूज निर्माण करतात.

एका वेळी जास्त प्रमाणात प्रोटीन असलेला आहार

वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही एकाच वेळी भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थ खात असाल तर काळजी घ्या. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. कारण प्रथिने पचायला वेळ लागतो. जेव्हा तुम्ही एकाच वेळी भरपूर प्रथिने खातात, तेव्हा पोटाला ते पचणे कठीण होते. म्हणूनच तुम्ही दिवसभर प्रथिने कमी प्रमाणात घ्या.

पोळी आणि भात

ताटात पोळी आणि भात दिला जातो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर दोन्ही एकत्र खाण्याची चूक करू नका. कारण पोळी आणि तांदूळ दोन्हीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतो. जेव्हा तुम्ही दोन्ही एकत्र खातात तेव्हा ते शरीरात स्टार्चचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे अनेक वेळा पचनामध्ये समस्या निर्माण होते आणि शरीरातील चयापचय प्रणाली विस्कळीत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग