मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special: उन्हाळ्यात बनवा पपई कोकोनट स्मूदी, वेट लॉससोबत पोट थंड ठेवण्यास करेल मदत

Summer Special: उन्हाळ्यात बनवा पपई कोकोनट स्मूदी, वेट लॉससोबत पोट थंड ठेवण्यास करेल मदत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2023 06:29 PM IST

Summer Drinks: उन्हाळ्यात अशा फूडची गरज असते जे सहज पचते आणि पोटात थंड राहते. ही स्मूदी प्यायल्याने दिवसभर एनर्जी तर राहतेच शिवाय हायड्रेशनही मिळते.

पपई कोकोमट स्मूदी
पपई कोकोमट स्मूदी (freepik)

Papaya Coconut Smoothie: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहार घेत असाल किंवा हेल्दी हायटचा पर्याय शोधत असाल, तर सकाळी हे रिफ्रेशिंग ड्रिंक योग्य ठरेल. लो फॅट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण, हे ड्रिंक सकाळी पोट भरल्यासारखे वाटेल. पपई आणि नारळाच्या पाण्याने तयार केलेले हे ड्रिंक मुले अगदी आरामात पिऊ शकतात. पपईमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनक्रिया योग्य ठेवते. त्वचा आणि डोळ्यांसाठीही हे फायदेशीर आहे. त्याच वेळी, नारळाचे पाणी शरीराला ऊर्जा देण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

ट्रेंडिंग न्यूज

पपई कोकोनट स्मूदी बनवण्यासाठी साहित्य

- अर्ध्या पपईचे तुकडे

- १ कप नारळाचे पाणी

- २ ते ३ पुदिन्याची पाने

- १ चमचा भिजवलेले चिया सीड्स

- ४-५ काजू

- एक चतुर्थांश टीस्पून हळद

- १ चमचा मध

पपई कोकोनट स्मूदी बनवण्यासाठी पद्धत

पपई कोकोनट स्मूदी उन्हाळ्यात पोटाला आराम देईल आणि पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करेल. त्याच वेळी हे लो फॅट ड्रिंक वजन कमी करण्यास देखील खूप मदत करेल. ते बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पपईचे तुकडे, नारळ पाणी, भिजवलेले चिया सीड्स, एक चतुर्थांश टीस्पून हळद, भिजवलेले काजू, मध, चार-पाच पुदिन्याची पाने टाका. सोबत दोन ते चार बर्फाचे तुकडे घालून चांगले ब्लेंड करा. तुमची चविष्ट स्मूदी तयार आहे. ग्लासमध्ये काढून सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग