मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Influenza Flu ने तब्येत खराब? लवकर बरे होण्यासाठी आहारात घ्या हे सुपरफूड्स

Influenza Flu ने तब्येत खराब? लवकर बरे होण्यासाठी आहारात घ्या हे सुपरफूड्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2023 01:51 PM IST

Influenza Flu Virus Recovery: इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे तुमची तब्येत बिघडली असेल तर या विषाणूला लवकर सामोरे जाण्यासाठी या खास सुपरफूड्सचा आहारात नक्कीच समावेश करा.

इन्फ्लुएंझा फ्लूपासून बरे होण्यासाठी सुपरफूड्स
इन्फ्लुएंझा फ्लूपासून बरे होण्यासाठी सुपरफूड्स (HT_PRINT)

Superfood for Influenza Flu Virus Recovery: कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एका व्हायरसने लोकांना घाबरवले आहे. इन्फ्लूएंझाचे व्हेरिएंट H3N2 ची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर काही मृत्यूनंतर सरकारने लोकांसाठी अॅडव्हायजरीही जारी केली आहे. ज्यामध्ये लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संसर्ग टाळण्यासाठी तज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी सांगत आहेत. ज्यामध्ये इन्फ्लूएन्झा फ्लूच्या बाबतीत मास्क घालणे, हात धुणे, घरी राहणे आणि आयसोलेट राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार ही इन्फ्लूएंझा H3N2 ची लक्षणे आहेत. ही सर्व लक्षणे कोरोना व्हायरस सारखीच आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

झपाट्याने बदलणाऱ्या हवामानात सर्दी होणे सामान्य आहे. पण काही वेळा ही लक्षणे इन्फ्लूएंझा विषाणूमुळे उद्भवतात. या प्रकरणात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शरीराची केवळ चांगली प्रतिकारशक्ती फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत करते. म्हणूनच हे ५ सुपर फूड्स स्वयंपाकघरात ठेवा आणि त्यांना तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करा.

दालचिनी

दालचिनी हा भारतीय घरांमध्ये वापरला जाणारा एक अतिशय सामान्य मसाला आहे. जे कधी कधी घरगुती उपचारांमध्ये काही रोगांमध्ये पेन किलर म्हणून वापरण्याचा सल्ला दिला जातो. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला हानिकारक रेणूंपासून वाचवण्यास मदत करतात. यासोबतच दालचिनीमध्ये अँटी व्हायरल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे ती इन्फ्लूएंझा आणि हर्पीस व्हायरसपासून संरक्षण करण्यास मदत करते.

मेथीचे दाणे

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की मेथीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड संयुगे असतात, ज्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा गुणधर्म असतो. ही कंपाउंड्स शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची झपाट्याने निर्मिती करतात. जे संसर्गआणि रोगाशी लढण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. मेथीचे दाणेआयुर्वेदिक आणि घरगुती उपचारांमध्ये अनेक आजारांवर वापरले जातात.

आले

आले हे अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी व्हायरल आणि पेन किलर म्हणून ओळखले जाते. खोकला आणि घसादुखीसाठी आले खूप फायदेशीर मानले जाते. इन्फ्लूएंझाच्या बाबतीत खोकला त्रास देतो, म्हणून बरे करण्यासाठी आले खूप मदत करते.

हळद

आयुर्वेदिक चिकित्सामध्ये हळद हे औषध म्हणून वापरले जाते. अँटी ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. हळदीमध्ये आढळणारे तत्व पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवते. आहारात हळदीचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लवंग

लवंगमध्ये अनेक संयुगे असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. लवंग खाल्ल्याने व्हायरल, बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel