मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  H3N2 Flu: धोकादायक आहे इंफ्लूएंझा विषाणू, ही लक्षणे दिसल्यास लगेच व्हा सावध!

H3N2 Flu: धोकादायक आहे इंफ्लूएंझा विषाणू, ही लक्षणे दिसल्यास लगेच व्हा सावध!

Mar 14, 2023 12:30 PM IST

Health Tips: WHO नुसार, H3N2 हा इन्फ्लूएंझा विषाणूचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने मानवांवर परिणाम करतो. येथे H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

H3N2 इंफ्लूएंझाची लक्षणे (REPRESENTATIVE PHOTO)
H3N2 इंफ्लूएंझाची लक्षणे (REPRESENTATIVE PHOTO) (HT_PRINT)

Symptoms and Prevention of H3N2 Virus: देशातील बहुतांश भागातील लोक फ्लू सारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. ताप, खोकला, नाक वाहणे आणि अंगदुखीचा त्रास जवळपास सर्वांनाच आहे. बदलत्या ऋतूमध्ये सिझनल फ्लू होऊ शकतो. आता भारतात H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अहवालांनुसार लोकांमध्ये फ्लूच्या लक्षणांमध्ये झपाट्याने वाढ होण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे थंड ते उष्ण हवामानात होणारा जलद बदल. WHO च्या मते, H3N2 हा इन्फ्लुएंझा ए विषाणूचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने मानवांवर परिणाम करतो. त्याची लक्षणे अतिशय सामान्य आहेत. येथे जाणून घ्या त्याची लक्षणेआणि ते कसे टाळता येईल

ट्रेंडिंग न्यूज

काय आहेत त्याची लक्षणे

H3N2 ची लक्षणे अतिशय सामान्य आहेत. यामध्ये खोकला, ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे/घसा दुखणे, अतिसार, नाक वाहणे, शिंका येणे यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे/अस्वस्थता, अन्न गिळण्यात अडचण आणि सतत ताप येऊ शकतो. जर कोणाला ही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोणासाठी आहे धोकादायक

H3N2 विषाणू अत्यंत सांसर्गिक असू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला खोकला, शिंकताना किंवा बोलतो तेव्हा तयार होणाऱ्या थेंबांद्वारे एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. व्हायरस असलेल्या पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यानंतर कोणी तोंडाला किंवा नाकाला स्पर्श करते तेव्हा देखील त्याचा प्रसार होऊ शकतो. गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि अंतर्निहित वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींना फ्लू-संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो.

संसर्ग होण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

- हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या लाळेच्या थेंबाद्वारे पसरतो. हा संसर्ग टाळण्यासाठी योग्य स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

- गर्दीची ठिकाणे टाळा आणि सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला.

- साबण आणि पाण्याने हात धुवा, विशेषत: जेवण्यापूर्वी आणि प्रवासानंतर.

- जर तुम्ही तुमचे हात धुवू शकत नसाल तर हँड सॅनिटायझर वापरा.

- स्वतःचे रक्षण करण्यासाठी, संक्रमित लोकांजवळ जाणे टाळा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel