Sev Puri: सणाला गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत शेव पुरी, नोट करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sev Puri: सणाला गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत शेव पुरी, नोट करा ही रेसिपी

Sev Puri: सणाला गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत शेव पुरी, नोट करा ही रेसिपी

Published Mar 26, 2024 06:08 PM IST

Snacks Recipe: होळी आणि धुलिवंदनला गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर तुम्ही शेव पुरी बनवू शकता. जाणून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी.

शेव पुरी
शेव पुरी (freepik)

Sev Puri Recipe: होळी हा रंग आणि पदार्थांचा सण मानला जातो. पुरण पोळीशिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो. शिवाय रंग खेळण्यासाठी घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील विविध गोड पदार्थ बनवले जातात. तुम्हाला या दोन दिवसात गोड खाऊन कंटाळा आला असेल तर आणि तोंडाची चव सुधारण्यासाठी काहीतरी चटपटीत खायचे असेल तर तुम्ही शेव पुरी बनवू शकता. ही रेसिपी बनवायचा खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. घरच्या घरी शेव पुरी कशी बनवायची ते जाणून घ्या

शेव पुरी बनवण्यासाठी साहित्य

- मैदा

- रवा

- ओवा

- तेल आवश्यकतेनुसार

- उकडलेले बटाटे

- कांदा चिरलेला

- टोमॅटो चिरलेला

- चवीनुसार मीठ

- लाल चटणी

- चिंचेची गोड चटणी

- हिरवी चटणी

- चाट मसाला

- चिमूटभर जिरेपूड

- लिंबाचा रस

शेव पुरी बनवण्याची पद्धत

शेव पुरी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा, रवा, मीठ, ओवा आणि तेल घालून मिक्स करा. यानंतर पाणी घालून पीठ मळून घ्या. आता या पीठाची मोठी पोळी लाटून घ्या. आता लहान गोलाकार कटरच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या कापून घ्या. तुम्ही यासाठी छोटी वाटी सुद्धा वापरू शकता. आता एका कढईत तेल गरम करा आणि पुरी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा. पुऱ्या थंड झाल्यावर आता एका प्लेटमध्ये पुऱ्या घ्या. त्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, कांदे, टोमॅटो आणि तिन्ही चटण्या, शेव, चाट मसाला, मीठ आणि जिरेपूड घाला. शेवटी लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner