Non Fried Dahi Vada Recipe: दही वड्याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. होळीच्या निमित्ताने बहुतेक घरांमध्ये दही वडे बनवले जातात. उडदाच्या डाळीपासून बनवलेल्या वड्याची चव जवळपास सगळ्यांनाच आवडते. पण निरोगी राहण्यासाठी जर तुम्ही तळलेले अन्न खाणे सोडले असेल तर यावेळी तेलात न तळता वडे तयार करा. हे वडे झटपट तर तयार होतातच शिवाय त्यांची चव देखील अप्रतिम असेल. चला तर मग जाणून घेऊया तेलात न तळता दही वडा कसा बनवायचा.
- दोन वाट्या उडीद डाळ
- दोन ते तीन हिरव्या मिरच्या
- एक इंच आल्याचा तुकडा
- एक चमचा बेकिंग पावडर
- एक चमचा जिरे
- चवीनुसार मीठ
सर्वप्रथम उडीद डाळ पाण्यात नीट भिजवून तीन ते चार तास राहू द्या. नंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि ग्राइंडरच्या भांड्यात ठेवा. तसेच यात हिरवी मिरची, आल्याचा सोललेला तुकडा आणि एक चमचा जिरे घाला. आता ही डाळ ग्राइंडर मध्ये बारीक करा. डाळ बारीक करताना काही अडचण येत असेल तर आवश्यकतेनुसार एक ते दोन चमचे पाणी टाका. हे मिश्रण घट्ट ठेवा. जर पेस्ट पातळ झाली असेल तर थोडा रवा घालून अर्धा तास बाजूला ठेवा. डाळीचे मिश्रण पातळ झाले तर त्यापासून वडा बनवणे कठीण होईल. आता डाळीच्या मिश्रणात एक चमचा मीठ आणि बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करा. जेणेकरून ते नीट फुलेल. आता आप्पे बनवण्याचा साचा गॅसवर ठेवा आणि त्यावर थोडे तेल लावा. यामुळे वडे याला चिपटणार नाही. आता तयार मिश्रण आप्प्याच्या साच्यात घाला आणि झाकून शिजवा. एक बाजू शिजल्यावर दुसरी बाजू शिजवा.
आता हे तयार झालेले वाडे मीठ मिसळलेल्या गरम पाण्यात टाका आणि दहा मिनिटे राहू द्या.आता हे नीट पिळून पाण्यातून काढा. दही फेटून मिक्स करा. आवडीनुसार तिखट गोड चटणी टाकून सर्व्ह करा.