मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Potato Facial: घरच्या घरी करा बटाट्याने फेशियल, ५ मिनिटात चमकेल चेहरा

Potato Facial: घरच्या घरी करा बटाट्याने फेशियल, ५ मिनिटात चमकेल चेहरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 27, 2023 02:28 PM IST

Homemade Facial: प्रत्येक भाजीची चव वाढवणारा बटाटा त्वचेचा रंग सुधारण्यासाठीही उत्तम मानला जातो. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सहज फेशियल करू शकता. बटाट्याने फेशियल कसे बनवायचे ते पहा.

बटाट्याचे फेशियल
बटाट्याचे फेशियल

Potato Facial for Glowing Skin: जास्त वेळ उन्हात राहिल्याने सनबर्न किंवा पिग्मेंटेशनची समस्या उद्भवते. यामुळे त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. त्याचबरोबर स्किन केअर रुटीन फॉलो केलं नाही तरी सर्व समस्या त्वचेवर दिसू लागतात. या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही घरच्या घरी बटाट्याच्या मदतीने फेशियल करू शकता. बटाट्यासह फेशियल कसे बनवायचे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

स्टेप १

फेशियलच्या पहिल्या स्टेपमध्ये क्लिंजींग करावं लागतं. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यावेत. त्यात दही आणि चिमूटभर हळद मिक्स करा. ब्रश किंवा हाताच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा आणि चेहरा धुवा. दही आणि बटाटे एकत्र केल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होईल.

स्टेप २

क्लिंजींग झाल्यानंतर त्वचेला स्क्रब करा. त्यासाठी बटाट्याच्या रसात तांदळाचे पीठ मिक्स करावे. त्यासोबत थोडं दही घालू शकता. या पेस्टने चेहरा नीट स्क्रब करा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे चेहऱ्यावरील सर्व डेड स्किन काढून टाकेल.

स्टेप ३

क्लिंजिंग केल्यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक आहे. यासाठी बटाट्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. या पेस्टने चेहऱ्याला ५-७ मिनिटे मसाज करा. मसाज केल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

स्टेप ४

फेशियलची शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक. यासाठी एका वाटीत बटाट्याच्या पेस्टमध्ये दही मिक्स करा आणि हळद घाला. चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आता ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर चांगली लावा आणि कोरडी होऊ द्या. आता ते स्वच्छ पाण्याने धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग