मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: लुफाने आंघोळ करता? सावधान! होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या उपाय

Skin Care: लुफाने आंघोळ करता? सावधान! होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 27, 2023 05:46 PM IST

फायबर आणि प्लास्टिकपासून तयार केलेल्या मऊ-मऊ लुफाशिवाय आंघोळ करणे अनेकांना आवडते. तुम्ही सुद्धा रोद लुफाने आंघोळ करत असाल तर लगेच ही सवय बदला. याने त्वचेवर साईड इफेक्ट्स होऊ शकतात.

लुफाने आंघोळ करण्याचे साईड इफेक्ट्स
लुफाने आंघोळ करण्याचे साईड इफेक्ट्स (freepik)

Side Effects of Bathing with Loofah: जर तुम्ही सुद्धा आंघोळीसाठी लुफाचा वापर करत असाल तर पुढच्या वेळी असे करण्यापूर्वी एकदा विचार करा. फायबर आणि प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या सॉफ्ट लुफाशिवाय आंघोळ करायला आवडत नसेल तर ताबडतोब आपली सवय बदलून टाका. होय, कारण आंघोळीदरम्यान फोम तयार करण्यासाठी वापरला जाणारा लुफा आपल्या त्वचेला आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. जाणून घेऊया कसे

ट्रेंडिंग न्यूज

लुफा वापरण्याचे त्वचेवर होणारे साईड इफेक्ट्स

जर्नल ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लुफामध्ये असलेल्या जीवाणूंमुळे त्वचेत संसर्ग होऊ शकतो आणि जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर हे संक्रमण आणि बॅक्टेरिया त्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात.

ओल्या लुफामध्ये बॅक्टेरिया वाढतात

शरीरावर जमा झालेली घाण आणि डेड स्किन सेल्स चोळून काढून टाकण्यासाठी लुफाचा वापर केला जातो. जर लुफा पूर्णपणे कोरडा नसेल तर हे जीव लुफामध्ये जमा होत राहतात आणि कालांतराने लुफाच्या आत वाढू लागतात. अशा वेळी लुफामधील बॅक्टेरिया पुन्हा शरीरात चिकटून राहतात.

आजारपणाचा धोका

जर लुफा पूर्णपणे कोरडा नसेल तर त्याच्या ओलसर वातावरणामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि त्यांची संख्या वेगाने वाढू लागते. अशावेळी त्वचा निरोगी होण्याऐवजी गंभीर आजारीही पडू शकते.

त्वचेच्या समस्या

त्वचा संवेदनशील असेल तर लुफाचा वापर करू नये. अन्यथा आंघोळीनंतर तुमची त्वचा लाल होऊन सोलून जाईल.

लुफाशी संबंधित या सामान्य चुका करणे टाळा

जर तुम्हाला तुमचा लुफा बॅक्टेरिया वाढण्याचे ठिकाण बनवायचे नसेल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

- आठ आठवडे किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लुफा वापरू नका.

- अनेकदा लोक त्वचा स्वच्छ करण्यासाठी लुफाने आपली त्वचा जोरात स्क्रब करू लागतात. असे केल्याने सैल त्वचेसह त्वचेची जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येण्याचा धोका असतो.

- नेहमी हलक्या हाताने लुफा त्वचेवर स्क्रब करा.

- त्वचेवर बॉडी वॉश लावल्यानंतर थेट त्वचेवर ल्युफा वापरल्याने त्वचा कडक होते. अशावेळी आंघोळ करताना लुफा गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवल्यास लुफा मऊ होईल.

- आंघोळीनंतर लगेच स्वच्छ पाण्याने लुफा धुवून उन्हात वाळवावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग