मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: पिग्मेंटेशन असो वा पिंपल्सची समस्या, दूर करण्यासाठी फायदेशीर आहे दही

Skin Care: पिग्मेंटेशन असो वा पिंपल्सची समस्या, दूर करण्यासाठी फायदेशीर आहे दही

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 24, 2023 02:04 PM IST

Curd For Skin Care: दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी त्वचेच्या डेड सेल्स साफ करण्याचे काम करतात. यात असलेले कॅल्शियम थकलेल्या निर्जीव त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. त्वचेसाठी दही कसे फायद्याचे आहे, जाणून घ्या.

चेहऱ्यावर दही लावण्याचे फायेद
चेहऱ्यावर दही लावण्याचे फायेद (unsplash)

Curd Benefits For Face: दह्याचा वापर आरोग्य राखण्यासाठी तसेच त्वचेचा रंग सुधारण्यासाठी केला जातो. आजपर्यंत तुम्ही दही खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आज आम्ही तुम्हाला दहीच्या मदतीने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती कशी मिळवू शकता हे सांगणार आहोत. दहीमध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने तसेच प्रोबायोटिक्स चांगल्या प्रमाणात असतात, जे त्वचेला पोषक तत्वांचा पुरवठा करतात. याशिवाय दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी त्वचेच्या मृत पेशी साफ करण्याचे काम करतात. यात असलेले कॅल्शियम थकलेल्या निर्जीव त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. दही त्वचेवर लावण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

चेहऱ्यावर दही लावण्याचे फायदे

एक्नेची समस्या

दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी एक्नेची समस्या दूर करण्याबरोबरच त्वचेला थंड करण्याचे काम करते. याशिवाय त्वचेवर दह्याचा वापर केल्याने जळजळ आणि मुरुमांपासूनही आराम मिळतो. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड डेड स्किन सेल्सना एक्सफोलिएट करते आणि चेहरा आतून स्वच्छ करून तेल निर्मिती नियंत्रित करते, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.

पिग्मेंटेशन

सनबर्न असो किंवा पिग्मेंटेशनची समस्या, या दोन्ही गोष्टींमुळे त्वचेची चमक गायब होते. अशावेळी दह्यातून मिळणारे हेल्दी फॅट्स त्वचेचा ओलावा सील करून त्वचेला दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. हे त्वचेची पीएच पातळी सुधारताना टॅन, पिग्मेंटेशन सारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत करते.

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेमुळे त्वचेला आतून तडे जाऊ लागतात. अशा परिस्थितीत दही तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. दह्यातील अल्फा हायड्रॉक्सी घटक पेशींमधील आर्द्रता बंद करून टोनिंग करण्यास मदत करते.

एजिंग

दही त्वचेचे अकाली सुरकुत्या आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करू शकते. दह्यामध्ये असलेले चांगले फॅट्स त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि चमक सुधारण्यास मदत करतात.

स्किन एलर्जी

दह्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म एलर्जी कमी करण्यास मदत करतात. त्यातील व्हिटॅमिन सी एलर्जीचा प्रभाव कमी करते. हे चेहऱ्याला आतून शांत करते आणि एलर्जीमुळे होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग