मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Mask: 'धक धक गर्ल' च्या सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनचे रहस्य आहे हे होममेड मास्क

Face Mask: 'धक धक गर्ल' च्या सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनचे रहस्य आहे हे होममेड मास्क

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 22, 2023 04:39 PM IST

Madhuri Dixit Beauty Secret: ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किनसाठी माधुरी दीक्षित दोन प्रकारचे फेस पॅक लावते. तिने तिच्या एजलेस ब्युटीबद्दल सांगताना काही टिप्स दिल्या.

माधुरी दीक्षित ब्युटी सीक्रेट
माधुरी दीक्षित ब्युटी सीक्रेट

Homemade Face Mask for Ageless Beauty: धकधक गर्ल माधुरी दीक्षित वयाच्या ५५ व्या वर्षीही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वयातही तिची फिट फिगर आणि चमकदार त्वचा बाकीच्या अभिनेत्रींना जबरदस्त टक्कर देते. प्रत्येकाला त्यांच्या चमकदार त्वचेचे रहस्य जाणून घ्यायचे असते. अशातच माधुरी दीक्षितने स्वत: व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यंग स्किन सीक्रेट लोकांना सांगितले. माधुरीचा हा व्हिडिओ युट्युबवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती आपल्या तरुण दिसणाऱ्या त्वचेबद्दल सांगत आहे. त्याचबरोबर तिने तिचा आवडता घरगुती मास्कही सांगितला. ते लावल्याने काही मिनिटांत मुलायम आणि चमकदार त्वचा मिळू शकते.

माधुरी दीक्षित लावते ओट्स फेस पॅक

ओट्सचा फेस पॅक चेहऱ्याची डेड स्किन स्वच्छ करण्याबरोबरच त्वचा मऊ बनवतो. यामध्ये असलेले मध अँटी इंफ्लेमेटरी आहे जे चेहऱ्यावरील जळजळ कमी करते. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- १ टीस्पून ओट्स पाउडर

- एक टीस्पून मध

- एक टीस्पून दूध किंवा गुलाब जल

या तिन्ही गोष्टी नीट मिक्स करून फेस पॅक तयार करा. हे चेहरा, मान आणि हातांवर लावा. सुमारे १५ ते २० मिनिटे थांबा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. या फेसपॅकचा वापर केल्यास चेहरा एकदम फ्रेश आणि मुलायम दिसतो.

ड्राय स्किनसाठी फेस पॅक

माधुरी दीक्षितला हिवाळ्यात हा फेसपॅक लावायला आवडतो. जे कोरड्या त्वचेसाठी आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- १ चमचा मध

- १ चमचा दूध

- १ टीस्पून एलोवेरा जेल

- २ थेंब इसेंशियल ऑइल

या चार गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यासह मानेवर लावा. सुमारे २० मिनिटांनंतर, हा पॅक कोमट पाण्याने स्वच्छ करा. या फेस पॅकमुळे त्वचा खूप चमकते आणि नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग