मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Pack: तुमच्या सौंदर्यात भर घालेल उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक, पाहा फायदे आणि बनवण्याची पद्धत

Face Pack: तुमच्या सौंदर्यात भर घालेल उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक, पाहा फायदे आणि बनवण्याची पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 23, 2023 02:48 PM IST

Skin Care Tips: बटाट्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा रंग तर सुधारू शकताच शिवाय त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर करू शकता. जाणून घेऊया उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे.

उकळलेल्या बटाट्याचा फेस पॅक
उकळलेल्या बटाट्याचा फेस पॅक (unsplash)

Boiled Potato Face Pack for Radiant Skin: आजपर्यंत तुम्ही बटाट्याचे विविध पदार्थ चाखले असतील. बटाट्याशिवाय बहुतांश भाज्या अपूर्ण राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे फक्त तुमच्या चवीचीच नाही तर तुमच्या सौंदर्याचीही चांगली काळजी घेऊ शकतात. होय, बटाट्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा रंग तर सुधारू शकताच शिवाय त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर करू शकता. उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक कसा बनवावा आणि तो त्वचेवर लावण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.

उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक कसा बनवावा

उकडलेल्या बटाट्यापासून फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम उकडलेल्या बटाट्याची साल काढून चांगले मॅश करा. ऑइली स्किन असलेल्या लोकांनी बटाट्यामध्ये बेसन मिक्स करावे. तर ड्राय स्किन असलेल्या लोकांनी बटाट्यात दुधाची साय किंवा मध मिक्स करावे. आता हे मिश्रण प्रथम आपल्या हातावर लावा आणि आपली एलर्जी टेस्ट करा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

उकडलेल्या बटाट्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

चेहऱ्याचा रंग वाढवतो

व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्याने बटाटा त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करू शकतो. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गोरी होते. याशिवाय बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करते. ज्यामुळे चेहऱ्याची सूज बरी होते.

काळे डाग दूर करा

अनेकदा जास्त ताणतणाव, रात्री उशिरापर्यंत जागणे किंवा जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे लोकांच्या डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. अशा स्थितीत उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक त्वचेवरील काळे डाग दूर करून त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतो.

पुरळ दूर होतात

उकडलेल्या बटाट्याचा फेस पॅक चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो. चेहऱ्यावरील पिंपल्स सायटोकाइन्समुळे होतात. उकडलेला बटाटा अँटी इंफ्लेमेटरी प्रभावामुळे मुरुमांच्या समस्येपासून आराम देतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग