मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relation Goal: नात्यात या गोष्टी चुकनही ॲडजस्ट करु नये, होऊ शकतो पश्चाताप

Relation Goal: नात्यात या गोष्टी चुकनही ॲडजस्ट करु नये, होऊ शकतो पश्चाताप

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 07, 2023 10:24 PM IST

प्रत्येक नात्यात काही गोष्टी ॲडजस्ट केल्या पाहिजे, असे म्हटले जाते. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच ॲडजस्ट करु नये. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स

Relationship Tips: कोणत्याही नात्यात दोन लोकांचे विचार वेगवेगळे असतात त्यामुळे तडजोड करावीच लागते. काही ना काही बाबतीत तुमचे विचार तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे. पण ॲडजस्टमेंट व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी ॲडजस्ट करणे किंवा सहन करणे चांगले नाही. अशा परिस्थितीत आपण या गोष्टी ॲडजस्ट करणे टाळले पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

पार्टनरचा अपमान करणे

पाहुण्यासमोर विनोदाच्या नावाखाली जोडीदाराचा अपमान करण्याची अनेकांना सवय असते. तर काही लोक आपल्या पार्टनरला टोमणे मारण्यात किंवा त्यांचा पाणउतारा करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा परिस्थितीत हे नेहमी ॲडजस्ट केल्याने तुमच्या आत राग साठत जाईल. असे अपमानाचे घोट पीत जगू नका.

रिलेशनशिप लपवून ठेवणे

जर तुमच्या जोडीदाराला हे नाते सर्वांपासून लपवून ठेवायचे असेल तर तुम्ही ते जुळवून घेऊ नये. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास तर कमी होईलच पण नात्यातील विश्वासही कमी होईल.

चुकीच्या गोष्टींबद्दल शांत राहणे

जर तुम्ही एकत्र कुटूंबात राहत असाल तर, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणे होतात. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनर प्रत्येक वेळी चुकीच्या लोकांचे समर्थन करून गप्प बसत असेल किंवा तुम्हाला गप्प राहण्याचा सल्ला देत असेल तर ते तुमच्या आणि तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. जोडीदाराने आपल्या पार्टनरसाठी स्टँड घेणे खूप महत्वाचे आहे.

तुम्हाला कमी लेखणे

तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल, दोन्ही बाबतीत तुमची स्वतःची ओळख आहे. ओळख फक्त पैसे कमवून बनत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमचा जोडीदार तुमच्या करिअरला काही महत्त्व देत नसेल, तर ही गोष्ट त्याला उघडपणे सांगा आणि ॲडजस्ट करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग