मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tips: नात्यात का महत्त्वाचा असतो गॅप, कधी द्यावा ते जाणून घ्या

Relationship Tips: नात्यात का महत्त्वाचा असतो गॅप, कधी द्यावा ते जाणून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 05, 2023 11:24 PM IST

Healhty Gap in Realtion: तुमचे नाते चांगले राहण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नात्यात प्रेम जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच कधी कधी नात्यातील दुरावा सुद्धा महत्त्वाचा असतो. रिलेशनशिपमध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांना कधी गॅप द्यावा हे जाणून घ्या.

नात्यातील हेल्दी गॅप
नात्यातील हेल्दी गॅप (unsplash)

Basic Topic for Relationship: नवरा बायकोचे नाते चांगले राहण्यासाठी त्यांनी एकमेकांपासून कोणतीही गोष्टी लपवू नये, असे म्हटले जाते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर केल्याने दोघांचा विश्वास आणखी वाढतो आणि परस्पर समज वाढते. पण प्रत्येक कपलसाठी हे लागू करता येत नाही. कारण कधी कधी माणसाचा स्वभाव ओव्हर अग्रेसिव्ह असतो, ज्यामुळे तुम्ही तुमची चूक तुमच्या पार्टनरला सांगितली तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात कधी लाइन बनवून ठेवली पाहिजे. हे रिस्पेक्टफुल डिस्टेंस तुमची स्ट्रेस लेव्हल सुद्धा कमी करेल आणि तुमच्या दोघांमधील भांडणाची शक्यता कमी करेल.

मित्रांसोबत पार्टी

प्रत्येक नात्याला एक महत्त्व असते. अशा परिस्थितीत जर तुमच्या पार्टनरला त्याच्या फ्रेंड सर्कलसोबत पार्टी करायची असेल तर त्याला स्पेस द्या. जर तुम्ही त्यांच्या सर्कल मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर ते परिस्थिती आणखी बिघडू शकते. शिवाय तुम्ही अनोळखी लोकांसोबत जास्त एन्जॉय देखील करू शकणार नाही.

मी टाइम

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा वेळ असतो. ज्यामध्ये त्याला स्वतःसाठी वेळ काढून शांत बसायचे असते किंवा त्याला हवे ते करायचे असते. अशा परिस्थितीत जोडीदाराला मी टाइममध्ये स्पेस द्या. यावेळी त्यांना त्रास देऊ नका. तुमच्या दोघांच्या नात्यासाठी ते चांगले राहील.

ऑफिस ग्रुप

ऑफिसमध्ये कुणाला आवडो किंवा न आवडो, पण ऑफिस म्हणजेच जॉब हाही जीवनाचा एक खास भाग आहे हे नाकारता येत नाही. तुमच्या जोडीदाराचा ऑफिस ग्रुप असेल तर त्याची जास्त चौकशी करू नका. जर तुमच्या जोडीदाराने काही शेअर केले तर तुम्ही ऐकून प्रश्न विचारू शकता, पण नेहमी स्वतंत्रपणे प्रश्न विचारणे टाळा.

नातेवाईक आणि कुटूंब

तुमच्या जोडीदाराचे नाते नातेवाइकांशी आणि कुटुंबाशी कसे आहे, हे तुमच्यापेक्षा त्याला चांगले माहीत आहे. अशा स्थितीत तुमच्या पार्टनरला तुमच्यानुसार वागण्याची, चालवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल बरे वाटत नसेल तर तुम्ही त्याबद्दल आरामात बोलू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

विभाग