मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  तुमचा नवरा तुम्हाला घरकामात का मदत करत नाही? असू शकतात 'ही' कारणं

तुमचा नवरा तुम्हाला घरकामात का मदत करत नाही? असू शकतात 'ही' कारणं

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 24, 2023 11:38 PM IST

Relationship Tips: जर तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला घरातील कामं करण्यात मदत करत नसेल तर त्याच्याशी भांडण्याआधी जाणून घ्या त्यामागील कारणे, ज्यामुळे बहुतेक मुलं घरकाम करण्यास टाळाटाळ करतात.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स

Why Husband Is Not Helping With House Chores: तुम्ही नेहमी अशा अनेक महिलांना तक्रार करतांना ऐकले असेल की त्यांचे पती स्वभावाने खूप चांगले आहेत पण त्यांना घरातील कोणत्याही कामात मदत करत नाहीत. ज्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवतो. इतकंच नाही तर लहान दिसणारी ही गोष्ट कधी कधी कुटुंबात भांडणं निर्माण करू लागते. विशेषत: जेव्हा पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात. जर तुम्हालाही अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या पतीशी भांडण्यापूर्वी जाणून घ्या ५ कारणे ज्यामुळे बहुतेक मुले घरकाम करण्यास टाळाटाळ करतात.

ट्रेंडिंग न्यूज

पुरुष घरकाम का करत नाहीत याची ही ५ कारणे

पुराणमतवादी विचार

भारतातच नव्हे तर जगभरात अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे पुरुष घरगुती जबाबदाऱ्यांच्या बाबतीत पुराणमतवादी विचारांचा अवलंब करतात. भांडी धुणे, कपडे घड्या करणे, घर स्वच्छ ठेवणे, स्वयंपाक करणे अशी घरातील काही कामे फक्त स्त्रियांसाठीच असतात, असे अशा पुरुषांचे मत असते.

पूर्वीची टीका

घरातील काही कामे केल्यामुळे तुमच्या पतीला काही टीकेला सामोरे जावे लागले असेल. अशा तऱ्हेने बहुतेक पुरुषांना कोणतेही काम करायला आवडत नाही, जे करताना त्यांना लोकांकडून कोणत्याही प्रकारची टोमणे किंवा टीका ऐकावी लागते. ते अशा गोष्टी करणे पूर्णपणे थांबवतात.

ते तुमच्याप्रमाणे गोष्ट पाहत नसतील

अनेकदा असे घडते की, एखाद्या व्यक्तीला अनेक कामे एकत्र करण्यासाठी दिली जातात. मग तो प्रथम छोटी महत्त्वाची कामे करण्यास सुरुवात करतो. यानंतर, जेव्हा मोठी कामे करण्याची वेळ येते तेव्हा तो त्यातील अनेक गोष्टी विसरतो. हे कोणालाही होऊ शकते. जर तुम्हीही तुमच्या पतीला खूप कामं सोपवली असतील, तर अपेक्षा करा की तो खूप काही विसरणार आहे.

बेजबाबदार

जर तुमचा नवरा असा व्यक्ती असेल ज्याला त्याच्या जागेवरून हलणे आवडत नसेल तर तो एक बेजबाबदार व्यक्ती असू शकतो. असे लोक त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची पर्वा न करता फक्त त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहतात.

सर्व जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः घेता

जर तुम्ही नेहमी घरातील सर्व कामे स्वतः करत असाल तर तो तुम्हाला तक्रार न करता करू देईल. तुमचे नाते सुरळीत चालण्यासाठी तुमच्यामध्ये कामाची विभागणी करायला शिका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग