मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tip: नवरा बायकोचे नाते हवे असेल सकारात्मक तर फॉलो करा या टिप्स

Relationship Tip: नवरा बायकोचे नाते हवे असेल सकारात्मक तर फॉलो करा या टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 04, 2023 11:44 PM IST

Husband and Wife Relation: पार्टनरसोबतचे नाते मजबूत असणे आवश्यक आहे. पण त्यासोबतच ते सकारात्मक असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तुमचेही नाते पॉझिटिव्ह आणि हॅपी रहावे असे वाटत असेल तर या गोष्टी फॉलो करायला विसरू नका.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स

Tips to Keep Husband Wife Relation Positive: नवरा बायकोचे नाते म्हटले की थोडे रुसवे फुगवे आणि थोडे प्रेम हे आलेच. नाते मजूबत राहण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करत असाल. यासोबतच नाते पॉझिटिव्ह असणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात कितीतरी गोष्टींचा प्रभाव नात्यावर पडत असतो. अनेक वेळा पार्टनरला पाहिजे तसा वेळ देता येत नाही. यातूनच त्यांच्यात वाद होतात आणि नात्यात एक प्रकारची कटुता येते. नात्याला हॅपी आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता. कोणत्या त्या जाणून घ्या.

सवय बनवा

रिलेशनशिपला पॉझिटिव्ह आणि मजबूत करण्यासाठी काही गोष्टींची सवय लावून घेणे गरजेचे आहे. जसे जेव्हा पण तुम्ही कामावर जात असाल किंवा काही कामानिमित्त बाहेर जात असाल तेव्हा आपल्या पार्टनरला मिठी मारा, किस करा. आठवड्यात एकदा क्रॉसवर्ड खेळा किंवा आठवड्यात एकदा आपल्या बेडरुममध्ये एकसोबत नाश्ता करा. अशा काही सवयी फिक्स करा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. या सर्व सवयी तुमची लाइफ स्थिर ठेवतील.

डिस्कस करा

आपल्या पार्टनर सोबत बोलणे खूप आवश्यक असते. तुमचे रिलेशन स्ट्राँग करण्यासाठी तुम्हाला अनेकांनी हा सल्ला दिला असेल. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये तुम्हाला कसे वाटते याबद्दल चर्चा करा. कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याबद्दल बोला. नात्यातील संवाद नाते आणखी मजबूत करते.

फ्लेक्सिबल रहा

तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना किती ओळखता हे आवश्यक नाही. पण तरीही असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा बोलणे आवडत नसेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला. नात्यात फ्लेक्सिबिलीटी असली पाहिजे. जास्त वेळ ताणून ठेवले तर नाते तुटण्याची भिती असते.

एकमेकांना स्पेस द्या

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याचा स्पेस देत असाल तर याने तुमचे नाते आणखी मजबूत होते. प्रत्येकाची स्वतःची एक लाइफ असते, ज्यात प्रत्येक वेळी फक्त तुम्हीच असावे हे गरजेचे नाही. तुमच्या पार्टनरला त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी स्पेस द्या.

 

एडजस्ट करा

तुमचा पार्टनर जसा आहे तसाच त्याला एक्सेप्ट करा. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या हनीमून पीरियडमध्ये रहायचे असते, जे आयुष्यभर शक्य नसते. अशा परिस्थितीत हनिमून पिरियड संपल्यावर निराश होऊ नका. तर आपल्या आयुष्याचा आणि जोडीदाराचा स्वीकार करा आणि चांगले आयुष्य जगा. जिथे गरज आहे तिथे गोष्टी एडजस्ट करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग