मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting tips: या पद्धतींनी तुमच्या मुलाला बनवा भावनिकदृष्ट्या हुशार, टिप्स करा फॉलो

Parenting tips: या पद्धतींनी तुमच्या मुलाला बनवा भावनिकदृष्ट्या हुशार, टिप्स करा फॉलो

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 09, 2023 04:31 PM IST

Emotionally Intelligent: आजकाल आत्महत्येसारखी प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच पालकांनी मुलांना मानसिकदृष्ट्या लहापणापासूनच मजबूत करणे गरजेचे आहे. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीतून स्वतःचे संरक्षण करू शकतील.

Parenting tips
Parenting tips (Freepik )

Tips for Child Care: पालक झाल्यानंतर मुलांवर एक चांगली व्यक्ती बनण्याची आणि उज्ज्वल भविष्य देण्याची मोठी जबाबदारी येते. यासाठी पालक आपल्या पाल्याची प्रतिमा समाजात चांगली व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. सर्वजण त्याची स्तुती करतात. आजच्या लेखात आपण पालक मुलांना भावनिकदृष्ट्या हुशार कसे बनवू शकतात याबद्दल जाणून घेऊयात.

मुलांना भावनिकदृष्ट्या 'असं' हुशार बनवा

> मुलांना भावनिकदृष्ट्या शार्प बनवण्यासाठी, लहानपणापासूनच त्यांना भावनिकदृष्ट्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मुल एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी आणि नाराज असेल तर त्याला भावनांना सामोरे जाण्यास सांगा आणि त्याचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर कसे करावे.

> मुले खूप संवेदनशील असतात, म्हणून त्यांच्याशी सहानुभूती बाळगा. लहान मुलं लहान-लहान गोष्टीत अतिरेक करत असतील तर त्यांना समजावून सांगा, दुर्लक्ष करू नका. त्यांचे शब्द प्रेमाने समजून घ्या. असे केल्याने मुलांना सुरक्षित वाटते.

> प्रत्येक गोष्टीवर मुलांशी मोकळेपणाने बोला जेणेकरून त्यांची मते जाणून घेता येतील. त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टी ऐका. असे केल्याने मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

> जेव्हा मूल एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असते, तेव्हा त्याला प्रेरित करा, ती गोष्ट सकारात्मकतेमध्ये कशी बदलता येईल. त्याच्यामध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करा.

WhatsApp channel

विभाग