मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: 'या' ५ गोष्टींचा मुलांवर होतो वाईट परिणाम! असे बोलणे टाळा

Parenting Tips: 'या' ५ गोष्टींचा मुलांवर होतो वाईट परिणाम! असे बोलणे टाळा

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 11, 2022 12:31 PM IST

पालकही मुलांचे संगोपन करताना जीवनाच्या पुस्तकातून रोज नवा धडा शिकत असतात.

परेंटींग टिप्स
परेंटींग टिप्स (Freepik)

Things you should never say to kids: मुलांचे संगोपन करणारे सर्वच पालक परफेक्ट असतात असे नाही. मुलांचे संगोपन करताना ते जीवनाच्या पुस्तकातून रोज नवा धडाही शिकत असतात. अशा परिस्थितीत नेहमी मुलांसाठी चांगले विचार करणाऱ्या पालकांकडूनही त्यांचे संगोपन करताना अनेक चुका होणे अपरिहार्य आहे.याचा अर्थ ते आपल्या मुलांवर प्रेम करत नाहीत किंवा त्यांचा चांगला विचार करत नाहीत असा होत नाही. अशा वेळी थोडी समज आणि सावधगिरी बाळगल्यास पालक काही चुका टाळू शकतात. जाणून घेऊया अशा गोष्टी ज्या पालकांनी आपल्या मुलांशी नकळतही बोलू नयेत.

ट्रेंडिंग न्यूज

ओरडण्याऐवजी समजावून सांगा

जर तुमच्या मुलाला त्याच्या वर्गात चांगले गुण मिळत नसतील तर त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याला सरळ ओरडायला सुरुवात करू नकात. असे केल्याने तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी होईल आणि त्याच्यात भीती निर्माण होईल. तुमच्या मुलाला चांगले काम करण्यास मदत करण्यासाठी स्वतः कठोर परिश्रम करा. त्याच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढेल.

वडिलांची धमकी देऊ नकात

अनेकदा असे दिसून आले आहे की मुले त्यांच्या आईच्या जास्त जवळ असतात आणि वडिलांसोबत कोणतीही गोष्ट शेअर करण्यास त्यांना थोडा संकोच वाटतो. यामागे मुलाच्या प्रत्येक छोट्या-छोट्या चुकीसाठी वारंवार वडिलांचे नाव घेऊन धमकावून मुलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात असावा. असे केल्याने मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदराऐवजी भीती बसू शकते.

मुलांना टोमणे मारू नका

अनेक वेळा पालक त्यांच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करताना त्यांना टोमणे मारायला लागतात. असे केल्याने अनेक वेळा मुले चिडतात आणि रागीट होतात. ते जे काही बोलेल ते मिळवण्यासाठी हट्ट करू लागतात.

इतर मुलांशी तुलना

अनेक वेळा पालक इच्छा नसतानाही मुलांशी भेदभाव करू लागतात. जेव्हा ते आपल्या मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करतात तेव्हा ते असे करतात. असे केल्याने मुलांच्या मनात न्यूनगंड वाढू लागतो.

मुलांचा आहार

काही पालकही मुलाच्या आहाराविषयी गडबड करू लागतात, ज्यामुळे मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि इतर मुलांपेक्षा स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.

WhatsApp channel

विभाग