मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: बाळाच्या मजबूत हाडांसाठी 'या' ५ तेलांनी करा मसाज! होईल चांगली वाढ

Parenting Tips: बाळाच्या मजबूत हाडांसाठी 'या' ५ तेलांनी करा मसाज! होईल चांगली वाढ

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 31, 2022 01:27 PM IST

Best Baby Massage Oils: चला जाणून घेऊया त्या ५ प्रकारच्या तेलांबद्दल जे बाळाला चांगले पोषण देण्यासोबत हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

बेबी मसाज
बेबी मसाज (Freepik)

बाळाला सक्रिय ठेवण्यासोबतच मजबूत हाडांसाठी मसाजही खूप महत्त्वाचा आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे बेबी मसाज ऑइल उपलब्ध आहेत. त्यापैकी बरेच रसायने आणि विषारी पदार्थांनी भरलेले आहेत. हे तेल बाळाच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत जाणून घेऊया त्या ५ प्रकारच्या तेलांविषयी जे बाळाला चांगले पोषण देण्यासोबत हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

ट्रेंडिंग न्यूज

बदाम तेल

या तेलाने बाळाला नियमित मसाज केल्याने त्याचा रंग सुधारतो आणि केस काळे आणि दाट होतात. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात तसेच स्नायू मजबूत होतात.

खोबरेल तेल

नारळाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे बाळाच्या शरीरातील वेदना आणि कडकपणा दूर करतात आणि त्वचेचे पोषण करतात. या तेलाचा वापर केल्याने बाळाच्या शरीरातील हाडे मजबूत होतात.

ऑलिव तेल

बाळाला ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने बाळाची हाडे मजबूत होतात आणि शरीराचा विकास योग्य प्रकारे होतो. हे तेल अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे बाळाचे शरीर सक्रिय ठेवण्यास देखील मदत करते.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल मुलाचे स्नायू आणि हाडे मजबूत करते. या तेलाने मसाज केल्यानेही मुलांच्या शरीराला ऊब मिळते.

तीळाचे तेल

बाळाच्या त्वचेचे पोषण करण्यासोबतच हे तेल रक्ताभिसरण सुधारते आणि संसर्ग टाळते. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग