मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी रोज कराव्यात 'या' ३ गोष्टी

Parenting Tips: मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी रोज कराव्यात 'या' ३ गोष्टी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 16, 2022 12:31 PM IST

Boost Kid Confidence: अनेक वेळा मुलं आयुष्यातील अनेक चांगल्या संधी केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे गमावतात.

मुलांमधील आत्मविश्वास
मुलांमधील आत्मविश्वास (Freepik)

Smart Parenting: प्रत्येक पालकाला लहानपणापासूनच आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास वाढवायचा असतो. आत्मविश्वासाने भरलेले मूल आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकते. अनेक वेळा मुलं आयुष्यातील अनेक चांगल्या संधी केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे गमावतात. अशा परिस्थितीत आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी पडू देऊ नये ही प्रत्येक पालकाची जबाबदारी बनते. चला जाणून घेऊया त्या ३ प्रभावी टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांमध्ये नवीन आत्मविश्वास भरू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

मुलांची स्तुती करा

मूल जेव्हा चांगले काम करेल तेव्हा त्याची स्तुती करा. तुम्ही असे केल्याने त्याला पुढच्या वेळी अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होईल. तो प्रत्येक कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.

मुलांवर प्रेम करा

तुमचा रागीट टोन आणि बोलण्यासाठी वापरली जाणारी भाषा यामुळे मुलाला अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांचे शब्द आवडीने ऐका. यामुळे मुले नेहमी आत्मविश्वासू राहतील.

नकारात्मक विचारांपासून दूर राहा

मुले नकळत त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून खूप काही शिकतात. अशा परिस्थितीत मुलांना नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी बनते. तसेच त्यांच्यासमोर कधीही नकारार्थी शब्द वापरू नका, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडाल, तुम्हाला दुखापत होईल इत्यादी. असे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होतो.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग