मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Roti Noodles Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा नूडल्स! पाहा रेसिपीचा Video

Roti Noodles Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा नूडल्स! पाहा रेसिपीचा Video

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 05, 2023 09:46 AM IST

Recipe Video: उरलेल्या, शिळ्या चपातीपासून तुम्ही हेल्दी आणि चविष्ट रोटी नूडल्स बनवू शकता. ही रेसिपी बनवायलाही सोपी आहे.

Roti Noodles Recipe
Roti Noodles Recipe (Freepik )

Desi Chinese Noodles: अनेकदा असे घडते की दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती जास्त प्रमाणात बनवली जाते आणि ती फ्रीजमध्ये ठेवावी लागते. दुसर्‍या दिवशीही ती चपाती कोणी खायला तयार होत नाहीत. अनेकदा लोक एकतर ही चपाती गाईला खाऊ घालतात किंवा बळजबरीने फेकून देतात. जर तुम्हीही चपाती वाया घालवत असाल तर जास्त बनवल्यानंतर ती कशी वापरायची हे समजत नसेल तर काळजी करू नका. शिळी उरलेली चपातीला चवदार बनवू शकता. आम्ही अशी एक रेसिपी सांगत आहोत, ज्याचे नाव ऐकल्यावर मुलांना नक्कीच खावीशी वाटेल. ही रेसिपी म्हणजे चपाती नूडल्स. होय, उरलेल्या चपातीपासून तुम्ही चवदार आणि आरोग्यदायी नूडल्स बनवू शकता. हे नूडल्स चपातीपासून बनवलेल्या आहेत आणि यात काही भाज्याही टाकणार आहोत त्यामुळे ही हेल्दी रेसिपी आहे. उरलेल्या चापातीपासून बनवलेल्या रोटी नूडल्सची रेसिपी cook_withrama या इंस्टाग्राम यूजरने शेअर केली आहे. चला जाणून घेऊया चपाती नूडल्स बनवण्याची रेसीपी...

ट्रेंडिंग न्यूज

चपाती नूडल्स बनवण्यासाठी साहित्य

उरलेली रोटी - १

तेल - १ टीस्पून

लसूण - १-२ लवंगा

कांदा - १ मध्यम आकाराचा

गाजर - १

सिमला मिरची - १ लहान

कोबी - १ कप

टोमॅटो सॉस - १ टीस्पून

लाल मिरची सॉस - १ टीस्पून

सोया सॉस - १ टीस्पून

मीठ - चवीनुसार

काळी मिरी पावडर - १/२ टीस्पून

लाल तिखट - १/२ टीस्पून

लिंबाचा रस - थोडासा

कोथिंबीर - गार्निशसाठी

चपाती नूडल्स कशी बनवायची?

> सर्व प्रथम उरलेली चपाती घ्या. त्याला चाकूच्या साहाय्याने पातळ आकारात कापून घ्या जेणेकरून ते नूडल्ससारखे दिसेल.

> कांदा, लसूण आणि गाजर, सिमला मिरची, कोबी अशा सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.

> आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाका. त्यात लसूण आणि कांदा घालून परता.

> आता त्यात गाजर, सिमला मिरची, कोबी टाकून नीट परतून घ्यावे.

> मंद आचेवर झाकण ठेवून मिश्रण शिजवा.

> आता टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर, मीठ, लाल तिखट घालून नीट मिक्स करा. नंतर चपाती घालून मिक्स करा.

> लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर देखील घाला.

> चविष्ट रोटी नूडल्स तयार आहेत. ताटात काढा आणि गरमागरम खाण्याचा आनंद घ्या.

WhatsApp channel

विभाग