मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Carrot And Beetroot Soup Recipe: ‘हे’ सूप हिवाळ्यात ठरेल इम्युनिटी बूस्टर! टेस्टलाही आहे बेस्ट

Carrot And Beetroot Soup Recipe: ‘हे’ सूप हिवाळ्यात ठरेल इम्युनिटी बूस्टर! टेस्टलाही आहे बेस्ट

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 04, 2023 02:58 PM IST

Immunity : हे इम्युनिटी बूस्टर सूप झटपट तयार करू शकता. हेल्थ सोबत हे चवीलाही उत्तम आहे.

प्रतिकारशक्ती
प्रतिकारशक्ती (Freepik )

Health Care: हिवाळ्यात अनेक छोटे मोठे आजार होतात. या आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी इम्युनिटी अर्थ प्रतिकारशक्ती चांगली असायला पाहिजे. पण जे जिभेला छान लागत ते शरीरासाठी चांगलं नसतं तर शरीरासाठी उपयुक्त असलेले पदार्थ चवीला चांगले लागत नाहीत असं म्हणतात. प्रत्येकाला जेवण चवदार आणि आरोग्यासाठी चांगले हवे असते. त्यामुळेच हिवाळ्यात सूप रेसिपीची क्रेझ वाढते. किचनमध्ये ठेवलेल्या भाज्या उत्तम पद्धतीने वापरायच्या असतील तर हिवाळ्यात सूपपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो. तुम्हालाही स्वयंपाकघरात ठेवलेल्या भाज्या सूपच्या रेसिपीसाठी वापरायच्या असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुमच्या प्रतिकारशक्तीची विशेष काळजी घेण्यासाठी तुम्ही बीट आणि गाजर वापरून चविष्ट सूप तयार करू शकता. इम्युनिटी बूस्टर सूप कसा तयार करायचा ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

सूप साठी लागणारे साहित्य

बीटरूट

ताजे गाजर

तूप

पाणी

लेमन जेस्ट

आले

हळद

काळी मिरी

वेलची

बडीशेप

बीटरूट आणि गाजर सूप रेसिपी

हे सूप तयार करण्यासाठी बीटरूट आणि गाजरचे छोटे तुकडे करा.

यानंतर गरम कढईत तूप गरम करा. या तुपात आले व इतर मसाले घाला.

सर्व मसाले घातल्यावर साधारण १ मिनिट परतून घ्या.

आता या मसाल्यांमध्ये गाजर आणि बीटरूटचे तुकडे एका पातेल्यात पाणी घालून ठेवा.

भाजी मध्यम आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.

गरम पुरी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या आणि बाहेर काढा.

यानंतर सूप पुन्हा पॅनमध्ये ठेवा.

सूप उकळा आणि चांगलं शिजू द्या.

शेवटी लिंबूच्या फोडीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग