मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chilled Water: आरोग्यासाठी हानिकारक आहे थंड पाणी, जाणून घ्या ते टाळण्याचे कारणं

Chilled Water: आरोग्यासाठी हानिकारक आहे थंड पाणी, जाणून घ्या ते टाळण्याचे कारणं

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 10, 2023 08:10 PM IST

Reasons to Avoid Chilled Water: उन्हाळ्यात फ्रिजमधील थंडगार पाणी तुमची तहान भागवते, पण ते प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारची हानी होते. जाणून घ्या ते टाळण्याची ५ कारणे.

थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम
थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम

Side Effectts of Drinking Chilled Water: उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी लोक थंड पाणी पिणे पसंत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमची तहान शमवण्यासाठी तुम्ही ज्याला सर्वोत्तम मानता, ते तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. पाणी जितके थंड असेल तितके अधिक हानिकारक परिणाम होतात. जर तुमचा आयुर्वेदावर विश्वास असेल तर ते थंड पाण्यापासून अंतर ठेवण्याचा सल्ला देते. यामुळे ज्यांना थंड पाणी प्यायला आवडते त्यांना हे माहित असावे की यामुळे ऊर्जा कमी होते आणि किडनी कमकुवत होते. अन्नासोबत कधीही थंड पाणी पिऊ नका कारण ते तुम्ही खाल्लेल्या सर्व तेलकट पदार्थांना घट्ट करते. या लेखात आम्ही सांगत आहोत की तुम्ही थंड पाणी का टाळावे.

ट्रेंडिंग न्यूज

थंड पाणी पिणे का टाळावे

पचनामध्ये होते समस्या

थंड पाणीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे पचनात अडथळा येतो. हे पचन दरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणते. हे आपल्या शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याने शरीराचे लक्ष पचनाकडे वळवते, ज्यामुळे पाणी कमी होऊ शकते आणि आपल्याला डिहायड्रेट वाटू शकते. म्हणूनच नेहमी रुम टेम्परेचरवर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

घसा खवखवणे

थंड पाणी न पिण्याचा सल्ला वडीलधारे लोक अनेकदा देतात. कारण थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि सर्दी होण्याची शक्यता वाढते. जेवल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने कफाचा त्रास होतो. जेव्हा ट्रॅक्ट कंजेशन होतो तेव्हा ते अनेक इंफ्लामेटरी संक्रमणास असुरक्षित बनते.

फॅट तुटणे प्रतिबंधित करते

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही जेवणानंतर लगेच थंड पाणी प्याल तर ते तुम्ही खाल्लेल्या अन्नातील चरबी घट्ट होईल, ज्यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त चरबी जाळणे कठीण होईल. अशावेळी जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही.

हृदयाची गती होते कमी

काही अभ्यासानुसार, थंड पाणी तुमचे हृदय गती कमी करण्यासाठी काम करू शकते. असे मानले जाते की बर्फाचे पाणी पिण्याने दहाव्या क्रॅनियल मज्जातंतूला - व्हॅगस मज्जातंतू उत्तेजित केले. पाण्याचे कमी तापमान नसा उत्तेजित करते, ज्यामुळे हृदय गती कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग