मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Care: केवळ हार्मोन्सच नाही तर डोळ्यांवरही परिणाम करतो थायरॉईड, काय आहे TED आणि त्याचे लक्षणं

Thyroid Care: केवळ हार्मोन्सच नाही तर डोळ्यांवरही परिणाम करतो थायरॉईड, काय आहे TED आणि त्याचे लक्षणं

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 05, 2023 04:46 PM IST

What is Thyroid Eye Disease: थायरॉईड आय डिसीज (TED) हा एक दुर्मिळ ऑटोइम्युन रोग आहे, ज्यामध्ये डोळ्याच्या स्नायूंना आणि डोळ्याच्या मागील फॅटी टिश्यूला सूज येते. हा आजार बहुधा हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांमध्ये होतो. याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

थायरॉईड आय डिसीज
थायरॉईड आय डिसीज (HT)

Symptoms and Prevention For Thyroid Eye Disease: थायरॉईड असंतुलित झाल्यावर उदासीनता, चिंता, निद्रानाश, लठ्ठपणा, प्रजनन क्षमता यांवर परिणाम तर होतोच, पण त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यालाही गंभीर नुकसान होऊ शकते. होय, थायरॉईडमुळे अनेकदा लोकांना थायरॉईड आय डिसीजचा सामना करावा लागू शकतो. ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते. ते या समस्येकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. पण असे करणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खरं तर थायरॉईड आय डिसीज (TED) हा एक दुर्मिळ ऑटो इम्यून रोग आहे, ज्यात डोळ्याच्या स्नायूंना आणि डोळ्याच्या पाठीमागील फॅटी टिश्यूंना सूज येते. हा आजार बहुधा हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांमध्ये दिसून येतो. क्वचित प्रसंगी थायरॉईड नसलेल्या लोकांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

जर आपण त्याच्या लक्षणांबद्दल बोललो, तर या आजारात रुग्णाची दृष्टी पूर्णपणे प्रभावित होत नाही. परंतु थायरॉईड आय डिसीजमुळे रुग्णाची दृष्टी अंधुक होणे, दुहेरी दृष्टी, डोळे कोरडे होणे किंवा जास्त पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा डोळा दुखणे होऊ शकते. डोळ्यांशी संबंधित या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला एक किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहिल्यावर कोणत्याही गोष्टीचा रंग पूर्वीसारखा तेजस्वी दिसत नाही. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी धूम्रपान सोडणे, सेलेनियम सप्लिमेंट घेणे आणि थायरॉईड हार्मोनची पातळी सामान्य राखणे आवश्यक आहे.

थायरॉईड आय डिसीज (TED) म्हणजे काय?

थायरॉईड आय डिसीज हा डोळ्यांच्या समस्येचा एक प्रकार आहे, ज्यामुळे स्नायू, फॅटी टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यूंना सूज आणि नुकसान होते. थायरॉईड आय डिसीजच्या बाबतीत संसर्गाशी लढण्याऐवजी तुमची रोगप्रतिकारक शक्ती चुकून थायरॉईड ग्रंथीवरच हल्ला करते. त्यामुळे थायरॉईड हार्मोन्स आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात तयार होतात आणि डोळ्यांवर परिणाम करू शकतात.

थायरॉईड आय डिसीजची लक्षणे

- कोरडे डोळे

- डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे वाटणे आणि वेदना होणे

- डोळे लाल होणे

- डोळ्यांना सूज येणे

- दुहेरी दृष्टी

- दृष्टी कमी होणे

थायरॉईड आय डिसीजपासून बचाव करण्याचे उपाय

- जीवनशैलीत सुधारणा

- धूम्रपानापासून दूर राहा

- डोळ्यांवर कोल्ड कॉम्प्रेस करा

- झोपताना पापण्या टेपने बंद करु शकता

- दुहेरी दृष्टीची समस्या दूर करण्यासाठी प्रिझम चष्मा घाला

- थायरॉईडच्या नियमित तपासण्या करा.

- हार्मोन्स संतुलित ठेवा

- डोळ्यांमध्ये समस्या जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग