मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cinnamon Tea: वजन कमी करण्यासोबतच मधुमेह नियंत्रित करतो दालचिनीचा चहा, असा होईल फायदा

Cinnamon Tea: वजन कमी करण्यासोबतच मधुमेह नियंत्रित करतो दालचिनीचा चहा, असा होईल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 04, 2023 05:40 PM IST

Health Benefits: दालचिनीचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वजन कमी करण्यासोबतच हा चहा रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो. चला जाणून घेऊया तो कसा बनवावा आणि त्याचे होणारे फायदे.

दालचिनीचा चहा पिण्याचे फायदे
दालचिनीचा चहा पिण्याचे फायदे (unsplash)

Benefits of Cinnamon Tea: दालचिनी हा भारतीय स्वयंपाकघरातील असा मसाला आहे, जो आरोग्याने परिपूर्ण आहे. याचा उपयोग फक्त भाज्यांची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, जस्त, तांबे, नियासिन आणि थायामिन सारखे घटक असतात. जे शरीराला भरपूर आवश्यक पोषण देण्यास मदत करतात. दालचिनीचा आहारात समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दालचिनी चहा. जे प्यायल्याने ते थेट रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचून फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया दालचिनी कोणत्या रोगांवर परिणाम करते आणि दालचिनीचा चहा कसा बनवायचा आणि कसा प्यायचा.

ट्रेंडिंग न्यूज

वजन कमी करण्यास मदत करते

सकाळचा चहा किंवा कॉफी ऐवजी दालचिनीच्या चहाने दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल. दालचिनीचा चहा प्यायल्याने चयापचय प्रणाली जलद कार्य करते आणि कॅलरी बर्न करते. जर तुम्ही दालचिनीची चव फिकी असल्यामुळे पीत नसाल तर तुम्ही त्यात थोडासा गूळ घालू शकता. गूळ हा आरोग्याचा खजिना देखील आहे आणि दालचिनी सोबत शरीराला अनेक फायदे मिळतात.

स्किनसाठी आहे वरदान

दालचिनीचा चहा प्यायल्याने जेव्हा चयापचय प्रक्रिया योग्य होईल तेव्हा अन्न देखील सहज पचते. त्वचेच्या समस्यांमागील एक कारण म्हणजे पचन आहे. म्हणूनच दालचिनीचा चहा प्यायल्याने एक्ने आणि पिंपल्सपासून सुटका मिळेल. तसेच फ्री रॅडिकल्सशी लढा देऊन, दालचिनी त्वचेवर सुरकुत्या पडू देणार नाही.

मासिक पाळीमध्ये फायदेशीर

जर मुलींना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना आणि क्रॅम्प्सचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी दालचिनीचा चहा पिणे सुरू करावे. यामुळे पोटदुखी आणि क्रॅम्पमध्ये आराम मिळतो.

तणावमुक्त राहण्यास मदत होईल

दालचिनीचा चहा प्यायल्याने मन शांत होते. तसेच मेंदूला तणावाशी लढण्यास मदत होते. तुमच्या सकाळ आणि संध्याकाळच्या चहा ऐवजी दालचिनी आणि गुळाचा चहा घ्या आणि आरोग्यात फरक पहा.

रक्तातील साखर नियंत्रित करते

मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त दालचिनीचा चहा प्यावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करते

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असते. ज्याला दालचिनीचा चहा प्यायल्याने नियंत्रित करता येते.

 

कसा बनवायचा दालचिनीचा चहा

दालचिनीचा चहा बनवण्यासाठी दोन कप पाणी गॅसवर ठेवा आणि त्यात एक चमचा दालचिनी पावडर किंवा एक इंच लांब दालचिनी घाला. नंतर ते अर्धे होईपर्यंत शिजवा. ते एका कपमध्ये काढा आणि त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडासा गूळ घालू शकता. यामुळे दालचिनी चहाची चव वाढेल आणि प्यायला सोपे जाईल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel