Tips to Clean Earthen Water Pot: उन्हाळा सुरू होताच थंड पाण्याची तल्लफही वाढू लागते. हे पूर्ण करण्यासाठी लोक फ्रीजमध्ये किंवा मातीच्या माठात पाणी ठेवू लागतात. तथापि अनेक लोकांना फ्रीजच्या पाण्यामुळे नुकसान होते. अशा स्थितीत त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन ते मातीच्या माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना माठातील पाणी प्यायला आवडते पण माठावर साचलेल्या धूळ आणि शेवाळामुळे प्रत्येक वेळी ते बदलावे लागत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुमचा जुना माठ नवीन कसा बनवू शकता हे सांगणार आहोत. जाणून घ्या माताचा माठ स्वच्छ करण्यासाठी टिप्स.
१. माठ पाण्याने भरण्यापूर्वी ते पाण्यात पूर्णपणे भिजवावे. असे केल्याने माठात पाणी साठविल्यास पाणी चांगले थंड होईल.
२. जुने मातीचे माठ स्वच्छ करण्यासाठी ते फक्त साध्या पाण्याने धुवू नका. माठ स्वच्छ करण्यासाठी पाणी, सर्फ आणि लिंबाची मदत घ्या. अर्धी बादली गरम पाण्यात एक चमचा सर्फ आणि लिंबाचा रस घाला आणि हे माठात घाला. आता त्यावर जमा झालेले शेवाळ आणि माती काढण्यासाठी स्क्रबरच्या साहाय्याने घासून माठ स्वच्छ करा. असे केल्याने माठातील माती तर स्वच्छ होईलच पण वासही निघून जाईल. यानंतर माठ वापरण्यापूर्वी एक किंवा दोनदा साध्या पाण्याने धुवा.
३. माठ स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा, १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून द्रावण तयार करा. आता हे द्रावण एका माठात टाका आणि स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने घासून घ्या. असे केल्याने काही मिनिटांत माठ स्वच्छ होईल आणि वासही निघून जाईल.
४. मातीचे माठ स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाकून साल टाकून उकळवा. हे पाणी माठात टाका आणि माठ स्वच्छ करा.
५. मातीच्या माठातील पाणी रोज बदलावे. तेच पाणी दोन-तीन दिवस भरून ठेवल्यास त्यामध्ये शेवाळ जमा होते. माठ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाची साल माठावर घासू शकता. त्यानंतर माठ पाण्याने धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)