मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: किचनमध्ये ठेवलेली प्लास्टिकची भांडी अशा प्रकारे करा स्वच्छ, लगेच निघतील घाणेरडे डाग

Cleaning Tips: किचनमध्ये ठेवलेली प्लास्टिकची भांडी अशा प्रकारे करा स्वच्छ, लगेच निघतील घाणेरडे डाग

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 29, 2024 08:34 PM IST

Kitchen Hacks: प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये तेल आणि हळदीचे डाग पडतात. जर ते व्यवस्थित साफ केले नाहीत तर हे डाग जमा होतात. प्लास्टिकचे भांडे साफ करण्यासाठी या टिप्स पाहा

प्लास्टिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स
प्लास्टिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Clean Plastic Utensils: बहुतेक घरांमध्ये प्लेट, लहान मुलांचे टिफिन आणि कंटेनर प्लास्टिकचे बनलेले असतात. हे खूप छान दिसतात. पण त्यांच्यावर एक डागही दिसला तर त्यांचे सौंदर्य बिघडते. प्लास्टिकची भांडी लवकर घाण होतात. विशेषत: प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये काही खाल्ल्यानंतर त्यावर तेल किंवा हळदीचे डाग राहतात. अशा स्थितीत ही भांडी साफ करताना खूप काळजी घ्यावी लागते. जर तुमच्या घरात प्लास्टिकचे डबे किंवा भांडी असतील आणि ती खूप घाण झाली असतील तर तुम्ही त्यांना स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करू शकता. हे खूप उपयुक्त आहेत. आणि प्लास्टिकच्या भांड्यावरील डाग लगेच निघतील.

प्लास्टिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बेकिंग सोडा वापरा

कोणत्याही प्रकारचे डाग साफ करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम आहे, विशेषतः जर डाग तेलाचे असतील. यासाठी फक्त एक किंवा दोन चमचे पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट घाणेरडी प्लेट किंवा डब्यावर लावा. आता काही वेळ तसेच राहू द्या. नंतर ते स्वच्छ करण्यासाठी ओले कापड वापरा.

डाग दूर करेल लिंबू

आंबट लिंबाच्या आम्लीय शक्तीमुळे घाणेरडी भांडी आणि कंटेनर स्वच्छ होतात. यासाठी फक्त लिंबाचा रस जिथे डाग आहे तिथे चोळा आणि एक-दोन दिवस उन्हात ठेवा. नंतर डिश साबणाने धुवा.

ब्लीच लावा

प्लॅस्टिकवरील डाग क्लोरीन ब्लीचने सुद्धा काढता येतात. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा ब्लीच मिक्स करा आणि ते विरघळवा. नंतर या द्रावणात कंटेनर आणि इतर वस्तू भिजण्यासाठी एक ते दोन तास ठेवा. डाग निघाल्यानंतर कंटेनर स्वच्छ धुवा आणि वाळवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग