Kitchen Hacks: दही जास्त आंबट झाले का? आंबटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Hacks: दही जास्त आंबट झाले का? आंबटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

Kitchen Hacks: दही जास्त आंबट झाले का? आंबटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

Apr 13, 2024 03:24 PM IST

Kitchen Tips: तुम्हाला माहिती आहे का दही खूप आंबट झाले तर फेकून देणे हा एकमेव उपाय नाही. दह्याचा आंबटपणा कसा काढायचा आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.

Kitchen Hacks: दही जास्त आंबट झाले का? आंबटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स
Kitchen Hacks: दही जास्त आंबट झाले का? आंबटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स (unsplash)

Tips to Reduce Sourness of Curd: उन्हाळ्यात जेवणासोबत सर्व्ह केले जाणारे दही फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर ते शरीराला थंड ठेवण्यासोबतच पचनक्रियाही व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. कडक ऊन आणि उष्णतेमध्ये शरीरात थंडावा टिकवण्यासाठी लोक उन्हाळ्यात लस्सी, रायता किंवा साधे दह्याचे सेवन करतात. पण बाजारातून विकत घेतलेले दही आवश्यकतेपेक्षा जास्त आंबट असले की समस्या निर्माण होते. बरेचदा लोक जास्त आंबट दही फेकून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का दही खूप आंबट झाले तर फेकून देणे हा एकमेव उपाय नाही. दह्याचा आंबटपणा कसा काढायचा आणि तुमच्या इच्छेनुसार त्याचा वापर कसा करायचा ते येथे जाणून घ्या. काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही दह्याचा आंबटपणा कमी करू शकता.

कोणते दही असते जास्त आंबट

दही विरजण लावताना जास्त विरजण वापरल्यास किंवा जास्त वेळ गरम ठेवल्यास ते खूप आंबट होते.

दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय

- दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी प्रथम दह्याचे पाणी काळजीपूर्वक वेगळे करा. आता त्यात थंड पाणी घाला आणि चमच्याने हळू हळू हलवा. लक्षात ठेवा की दह्याची साय किंवा क्रीम पाण्यात विरघळू नये. नंतर चाळणीतून गाळून त्यातील पाणी वेगळे करा.

- दूध गरम करून पूर्णपणे थंड करा. दह्यामध्ये थंड दूध घाला आणि नंतर चांगले मिक्स करा. फ्रिजमध्ये ३० मिनिटे ठेवा. फ्रीजमधून बाहेर काढा. पुन्हा एकदा मिक्स करा आणि दही खा. दुधाच्या ताजेपणाचा दह्याच्या आंबटपणावर परिणाम होतो.

- दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी फ्रेश क्रीम किंवा ताजी साय देखील काम करते. यासाठी दुधापासून साय वेगळी करून थंड करा. दही सुद्धा फ्रिजमधून बाहेर काढा. आता दह्यात ताजी दुधाची साय टाका. मिक्स करून सेवन करा. दह्यामध्ये दुधाची ताजी साय घालून मिक्सही करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner