मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Happiness Day: रोजच्या या ५ आवश्यक गोष्टी वाढूव शकतात तुमचा हॅपीनेस इंडेक्स

International Happiness Day: रोजच्या या ५ आवश्यक गोष्टी वाढूव शकतात तुमचा हॅपीनेस इंडेक्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 19, 2023 11:06 PM IST

International Day of Happiness 2023: आनंदी राहिल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. आंतरराष्ट्रीय आनंदी दिनानिमित्त, जाणून घ्या की या ५ रोजच्या आवश्यक गोष्टी तुमचा हॅपीनेस इंडेक्ट वाढवू शकतात.

हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

Important Things to Increase Happiness in Life: आपल्या सर्वांना आनंदी व्हायचे आहे. आपण दु:खी व्हावे असे आपल्याला कधीच वाटत नाही. पण जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी राहतो. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे आपण तणावाखाली जगू लागतो. आणि नीट हसतही नाही, आनंदी राहणे तर दूरची गोष्ट. आनंदी राहिल्याने आपले हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहतात. आनंदाचे महत्त्व समजून घेण्यासाठी जागतिक आनंदी दिन किंवा इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस (International Day of Happiness) दिवस साजरा केला गेला.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी आनंदाचे महत्त्व ओळखले आहे. हे लक्षात घेऊन २०१३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, २० मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय आनंदी दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे महत्त्व जाणणे हा आहे.

स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी फॉलो करा हे ५ हॅपीनेस हॅक्स (Happiness Hacks)

१. मनाला आनंद देणाऱ्या कथा वाचा

स्टँडिंग कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना एकदा विचारण्यात आले होते की तुम्ही नेहमी आनंदी कसे असता? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी नेहमी हलके फुलके संवाद साधा. कधीही राग किंवा द्वेषाने बोलू नका. यामुळे मन उदास होईल. मन जड करणाऱ्या कथा वाचू नका किंवा टीव्हीवर पाहू नका. त्याऐवजी तुम्हाला आनंद देणाऱ्या, हसवणाऱ्या आणि गुदगुल्या करणाऱ्या कथा वाचा. मनोरंजनाचे कार्यक्रम पहा.

२. आनंदी राहण्यासाठी चांगली झोप सर्वात महत्वाची

द सायकोलॉजी ऑफ हॅपीनेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखानुसार, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. कमी तापमानामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी विशेषतः एलईडी बल्ब, घड्याळे, डिजिटल उपकरणे बंद करा. त्यांना तुमच्यापासून इतके दूर ठेवा की त्यांच्यातील प्रकाश तुम्हाला झोपण्यापासून रोखणार नाही. झोपण्यापूर्वी सूदिंग म्युझिक शांत झोप घेण्यास मदत करते.

३. तुमच्या आवडीचे हेल्दी फूड घ्या

न्यूट्रिएंट जर्नलनुसार, मन लावून खाल्ल्याने आपला मेंदू आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. पण मेंदूच्या पेशी आणि पचनसंस्था या दोन्हींवर भरपूर आणि जास्त तळलेले अन्न यांचा परिणाम होतो. म्हणूनच इच्छा असूनही आपण आनंदी राहू शकत नाही. पोट आणि मेंदू यांच्यात योग्य संवाद होणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या आवडीचे अन्न घ्या. पण तळलेले, डबाबंद आणि मसालेदार पदार्थ तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकतात.

४. ध्यान करा

ब्रिटीश जर्नल ऑफ सायकियाट्रीच्या मते, ध्यान केल्याने मन निश्चितच शांत होते आणि आनंदाची भावना निर्माण होते. ध्यान केल्याने मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो. हा आपल्या मेंदूचा चांगला भाग आहे. त्यामुळे अस्वस्थ मन शांत होते. ध्यानमुळे चिंता आणि नैराश्य कमी होऊ शकते. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करेल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल. म्हणूनच तुम्ही डोळे बंद करून ५ मिनिटे बसून सुरुवात करू शकता.

५. आपल्या पाळीव प्राण्यांसोबत रहा

अॅनिमल जर्नलच्या मते, मलेशियामध्ये कोविड- १९ लॉकडाऊन दरम्यान पाळीव प्राण्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि वेल बीइंगवर होणाऱ्या परिणामांवर एक अभ्यास करण्यात आला. त्याच्या निष्कर्षात असे सांगण्यात आले की, पाळीव प्राण्यांसोबत राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य पाळीव प्राण्यांसोबत न राहणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असल्याचे आढळून आले. तुमच्याकडे असलेल्या सर्व पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढा. त्यांची काळजी घ्या त्यांना तुमच्यासोबत फिरायला घेऊन जा. यामुळे फील-गुड हार्मोन एंडोर्फिन वाढेल आणि तुम्हाला आनंद मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel