मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Oral Health Day: दातांवरील पिवळेपणा नॅचरली दूर करतात हे फळं, ओरल हेल्थसाठीही आहे फायदेशीर

World Oral Health Day: दातांवरील पिवळेपणा नॅचरली दूर करतात हे फळं, ओरल हेल्थसाठीही आहे फायदेशीर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 19, 2023 09:49 PM IST

Oral Health Tips: दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवशी मौखिक आरोग्याबाबत लोकांना जागरुक केले जाते. जर तुम्हाला दातांचा पिवळेपणा नैसर्गिकरित्या दूर करायचा असेल तर हे फळे खा.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि ओरल हेल्थसाठी फळं
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि ओरल हेल्थसाठी फळं (unsplash)

Fruits to Remove Yellow Stains From Teeth Naturally: तोंडाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. कमकुवत दात आणि हिरडे फक्त त्रासदायक नसतात तर अन्न नीट चावून खाण्यासही त्रास होतो. त्यामुळे पचनाचा त्रास सुरू होतो. याशिवाय दात पिवळे पडणे, श्वासाची दुर्गंधी यामुळेही लाज वाटते. म्हणूनच तोंडाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. २० मार्च रोजी साजरा करण्यात येत असलेल्या जागतिक मौखिक दिनाचा (World Oral Health Day) उद्देश लोकांमध्ये तोंड आणि दातांच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे.

फिजिकल अट्रॅक्टिव्ह दिसण्यात मदत करतात दात

तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगभरातील लोक अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. हे टाळण्याचा मार्ग म्हणजे ओरल हायजीन. तोंडाची स्वच्छता आरोग्याच्या समस्या तसेच शारीरिकदृष्ट्या आकर्षक ठेवण्यास मदत करते. विशेषतः निरोगी आणि चमकदार दात. दातांवर घाण साचू द्यायची नसेल तर ही फळे खा. हे नैसर्गिकरित्या दातांवर इनॅमलचा थर गोठू देत नाही.

सफरचंद

"अॅन अॅपल अ डे किप्स द डॉक्टर अवे" ही इंग्रजी म्हण पूर्णपणे बरोबर आहे. दररोज एक सफरचंद खाण्याने विविध रोगांपासून संरक्षण तर होतेच शिवाय दात स्वच्छही राहतात. चावून खाललेल्या सफरचंदातील फायबर तत्त्वमुळे कॅविटीवाले बॅक्टेरिया दातांमधून काढून टाकण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते आणि ही लाळ तोंडातील घाण साफ करण्यास मदत करते.

अननस

पेअर आणि अननस खाल्ल्याने दात साफ होतात आणि दातांवर कॅविटीचा थर जमत नाही. अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे दातांमध्ये साचलेला प्लेक काढून टाकण्यास मदत करते आणि नैसर्गिकरित्या दातांचे पिवळेपणा दूर करते.

पेरू

पेरूची पाने केवळ हिरड्यांच्या आरोग्यासाठी चांगली नाहीत, उलट, ते संपूर्ण ओरल हेल्थ देखील राखते. एक पेरू रोज दाताने तोडून खाल्ल्यास दातांची पिवळेपणा स्क्रब होते आणि दात चमकू लागतात.

गाजर

फळांसोबतच हिरव्या पालेभाज्या, सेलेरी आणि गाजर देखील नैसर्गिकरित्या दातांवर जमा होणारा इनॅमल कमी करण्यास मदत करतात. कच्चे गाजर खाल्ल्याने तोंडात लाळ निर्माण होते, त्यामुळे ते क्लींजिंग म्हणून काम करते. यामुळे हिरड्या तर मजबूत होतातच पण दातांवर जमा झालेला प्लेकही सहज निघतो.

व्हिटॅमिन सी समृद्ध फळे

व्हिटॅमिन सी समृध्द फळे दातांचा पिवळेपणा साफ करण्यास आणि तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. संत्री आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दातांवर जमा झालेली पिवळी घाण सहज निघून जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel