मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Teeth Whitening: पिवळ्या दातांची काळजी सोडा, 'या' घरगुती उपायांनी मिळतील चमकदार दात

Teeth Whitening: पिवळ्या दातांची काळजी सोडा, 'या' घरगुती उपायांनी मिळतील चमकदार दात

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2023 10:54 AM IST

दात पिवळे पडल्यामुळे अनेकांना हसता येत नाही किंवा उघडपणे बोलता येत नाही. जे वाईट दिसते आणि लाजिरवाणे देखील वाटते. घरच्या घरी पिवळे दात उजळता येतात.

पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय
पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय

Home Remedies for Yellow Teeth: तोंड उघडताच पिवळे आणि घाणेरडे दात दिसले तर तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. अनेक वेळा पिवळ्या दातांमुळे लोक उघडपणे हसूही शकत नाहीत. तुमचेही दात पिवळे झाले असतील तर घरगुती उपायांनी वेळीच तुम्ही ते चमकवू शकता. कारण दातांवर साचलेली घाण आणि पिवळटपणा म्हणजे प्लेक आणि टार्टर असते, जो एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. सतत साचत राहिल्याने तोंडातून दुर्गंधी येऊ लागते आणि डॉक्टरांकडे गेल्यावरच ती साफ करावी लागते. या घरगुती उपायांनी दाताचा पिवळेपणा घालवता येतो.

ट्रेंडिंग न्यूज

दोनदा ब्रश करणे आवश्यक

तज्ञ नेहमी दोनदा ब्रश करण्याची शिफारस करतात. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने तोंडात साचलेले बॅक्टेरिया साफ होतात. पण यामुळे दातांवरील पिवळसरपणाचा थर साफ होत नाही. दातांवरील पिवळे डाग काढण्यासाठी या टिप्स वापरून पहा.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा दात स्वच्छ करण्यास मदत करतो. काही दिवस वापरल्याने फरक पडू शकतो. टूथब्रशमध्ये बेकिंग सोडा घेऊन दात स्वच्छ करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि दात बोटांनी घासून स्वच्छ करा. काही दिवसात दातांवर जमा झालेला पिवळा थर साफ होऊ लागतो.

रॉक सॉल्ट

दातांवर साचलेली पिवळी घाण साफ करण्यासाठी आम्ही आजींच्या काळापासून वापरात असलेली रेमेडी ट्राय करु शकता. पिवळ्या थरात तसेच पायरियामध्ये आराम मिळतो. मोहरीचे तेल रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठात मिक्स करुन दात स्वच्छ करा. यामुळे दात चमकतील आणि तोंडातून येणारा दुर्गंध दूर होईल.

स्ट्रॉबेरी दातांवर घासा

स्ट्रॉबेरीचा वापर दात स्वच्छ करण्यासाठीही करता येतो. ही एक अतिशय सुरक्षित कृती असू शकते. स्ट्रॉबेरीचा तुकडा दातांवर घासून घ्या, मग ब्रश करा. यामुळे दात चमकतील.

कडुलिंबाचे दातून

जर तुम्हाला दातांवर पिवळा थर बसू द्यायचा नसेल तर तो कडुलिंबाच्या दातुन म्हणजे काडीने घासून घ्या. यामुळे दात स्वच्छ होतात आणि ते चमकदार राहतात. दातांचा पिवळेपणा साफ करण्यासाठी ही रेमेडी फक्त एक सूचना आहे. हे कोणत्याही थेरपीचा पर्याय मानू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग