मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Colour: मेथीपासून बनवा केसांसाठी नॅचरल कलर, हेअर फॉल कमी करण्यासाठी असे वापरा

Hair Colour: मेथीपासून बनवा केसांसाठी नॅचरल कलर, हेअर फॉल कमी करण्यासाठी असे वापरा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 13, 2023 03:54 PM IST

Natural Hair Colour: अनेक वेळा केवळ केस गळणेच नाही तर केसांशी संबंधित इतर अनेक समस्या देखील व्यक्तीला सतावू लागतात. जर तुम्हीही अशा कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर मेथी तुमची मदत करू शकतात. कसे ते जाणून घ्या.

मेथीच्या पानांपासून नॅचरल हेअर कलर
मेथीच्या पानांपासून नॅचरल हेअर कलर

Fenugreek Leaves Hair Colour: चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होत आहे. केस अकाली पांढरे होण्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्याचा आत्मविश्वासही दुखावतो. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल बेस्ड हेअर कलर वापरायला लागतात. यामुळे अनेक वेळा केस गळणेच नाही तर केसांशी संबंधित इतर अनेक समस्या देखील व्यक्तीला सतावू लागतात. जर तुम्हीही अशा कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर मेथीची पाने तुमची मदत करू शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, तीच मेथी, ज्याची भाजी, थालीपीठ तुम्हाला खायला आवडतात.

मेथीच्या पानांपासून हेअर कलर कसा बनवायचा

मेथीच्या पानांपासून हेअर कलर बनवण्यासाठी आधी मेहंदी पावडर आणि इंडिगो पावडर भिजवा. आता ताजी मेथीची पाने बारीक करून पेस्ट तयार करा. यानंतर मेहंदीच्या पावडरमध्ये मेथीची पेस्ट, हेअर कंडिशनर आणि खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण २ तास झाकून ठेवा.

मेथीचा कलर लावण्याची योग्य पद्धत

मेथीचा हेअर कलर लावण्यापूर्वी प्रथम कंगव्याने केस नीट विंचरा. आता ब्रशच्या मदतीने हेअर कलर स्कॅल्पपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. २ तासांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन शॅम्पू करा. तुम्हाला हवे असल्यास मेथी सुकवून त्याची पावडर बनवून साठवून ठेवता येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग