मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? ट्राय करा मोहरीच्या तेलाची ही रेमेडी

Home Remedies: दातांचा पिवळेपणा दूर करायचाय? ट्राय करा मोहरीच्या तेलाची ही रेमेडी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 10, 2023 11:40 AM IST

Tips to Get Rid of Yellow Teeth: दात पिवळे होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाची मदत घेऊ शकता. मोहरीच्या तेलाने दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो आणि हिरड्याही मजबूत होतात.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय (pexels)

Mustard Oil Remedy for Yellow Teeth: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात तुमचे दात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण काही वेळा दात पिवळे पडणे हे व्यक्तीसाठी लोकांसमोर लाजिरवाणे ठरू शकते. अनेकांची तक्रार असते की रोज घासूनही दातांचा पिवळेपणा दूर होत नाही. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वेळा लोक बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करण्यास सुरुवात करतात. परंतु हे प्रोडक्ट्स तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील हानिकारक असू शकतात. अशा परिस्थितीत दात पिवळे होण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाची मदत घेऊ शकता. मोहरीच्या तेलाने दात घासल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होईल आणि हिरड्याही मजबूत होतील. चला जाणून घेऊया मोहरीच्या तेलाच्या या घरगुती उपायाच्या मदतीने तुम्ही दाताच्या पिवळेपणापासून कशी सुटका मिळवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

मोहरीच्या तेलाने दात कसे स्वच्छ करावे

मोहरीचे तेल आणि मीठ

मोहरीचे तेल आणि मीठ याने दात सहज स्वच्छ केले जाऊ शकते. त्यांचा वापर करण्यासाठी १/२ चमचे मोहरीच्या तेलात १ चिमूट मीठ मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण दातांवर लावा आणि हलक्या हाताने चोळा. हा उपाय रोज केल्याने दातांचा पिवळेपणा सहज निघून जाईल.

मोहरी आणि हळद

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीच्या तेलात अर्धा चमचा हळद मिक्स करा. ही पेस्ट पिवळे झालेल्या दातांवर चोळा. ही पेस्ट रोज वापरल्यास दातांचा पिवळेपणा काही दिवसातच निघून जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग