Weight Loss: वजन कमी करायचं असेल तर कॉफी मध्ये मिक्स करा या २ गोष्टी, झपाट्याने होईल वेट लॉस
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: वजन कमी करायचं असेल तर कॉफी मध्ये मिक्स करा या २ गोष्टी, झपाट्याने होईल वेट लॉस

Weight Loss: वजन कमी करायचं असेल तर कॉफी मध्ये मिक्स करा या २ गोष्टी, झपाट्याने होईल वेट लॉस

Feb 08, 2023 07:16 PM IST

Weight Loss Drinks: आजकाल लोकांना वजन कमी करण्यासाठी वेट लॉस ड्रिंक प्यायला आवडते. हे लिंबू आणि दालचिनी कॉफीमध्ये मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी कॉफी
वजन कमी करण्यासाठी कॉफी (unsplash)

Weight Loss With Coffee Drink: आजकाल प्रत्येकाला स्लिम फिट राहायचं असतं. यासाठी लोक हेल्दी डाएट आणि ड्रिंक फॉलो करतात. व्यायामासोबत काही खास वेट लॉस ड्रिंक प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. पण जर तुम्ही दिवसाची सुरुवात कॉफीने करत असाल आणि ते सोडू शकत नसाल तर काळजी करू नका. आता कॉफी पिऊनही वजन कमी करता येते. कॉफीमध्ये काही गोष्टी मिसळून वेट लॉस ड्रिंक तयार करता येते. हे ड्रिंक तुमच्या कॉफीच्या सवयीसाठी देखील चांगले आहे आणि वजन कमी करण्यासाठी वेगळे वेट लॉस ड्रिंक पिण्याची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कॉफीमध्ये कोणत्या गोष्टी मिसळून प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

सिनेमन कॉफी

सिनेमन म्हणजे दालचिनी, हा मसाला वजन कमी करण्यासाठी वापरता येतो. एक कप ब्लॅक कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने या पेयाचे फायदे वाढतात. कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन आणि दालचिनीतील अँटि ऑक्सिडंट्स मिळून वजन कमी करण्याची प्रक्रिया वाढते. या ड्रिंकच्या मदतीने मेटाबॉलिक रेट चांगला राहतो. हे ड्रिंक तयार करण्यासाठी, ब्लॅक कॉफीमध्ये फक्त एक चतुर्थांश चमचा दालचिनी पावडर आणि मध घाला.

लेमन ज्यूस कॉफी

लिंबाच्या रसामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. कॅफिनसह व्हिटॅमिन सी चयापचय प्रणाली बरे करते. त्यामुळे फॅट बर्निंग हार्मोन्स सक्रिय होतात. हे ड्रिंक बनवण्यासाठी फक्त एक कप ब्लॅक कॉफीमध्ये थोडी दालचिनी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.

ब्लॅक कॉफी

जर तुम्ही दुधाची कॉफी पित असाल तर त्याऐवजी ब्लॅक कॉफी प्या. हे ड्रिंक वजन कमी करण्यास देखील मदत करते. उकळत्या पाण्यात एक चमचा कॉफी घाला आणि उकळवा. दररोज एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच चयापचय प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner