Vivo V30 Series Social Nation Returns: व्हीवो व्ही३० सिरीज सोशल नेशन २० आणि २१ एप्रिल रोजी जिओ वर्ल्ड गार्डन, मुंबई येथे होणार आहे. हा आशियातील सर्वात मोठ्या क्रिएटर फेस्टिव्हलपैकी एक आहे. फॅन्सला पुन्हा एकदा सुंदर अनुभव देण्यासाठी हा इव्हेन्ट सज्ज झाला आहे. वन डिजिटल एन्टरटेन्मेन्ट द्वारे सादर केलेला आणि झोमॅटो लाईव्ह (Zomato LIVE) द्वारे प्रझेन्ट केला जाणारा हा खास इव्हेन्ट असणार आहे. हा दोन दिवसांचा अनोखा प्लॅटफॉर्म निर्मात्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना इंटरनेटवर सर्व गोष्टींशी जोडण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी एक अनोखा प्लॅटफॉर्म ऑफर करतो.
GenZ सुपरस्टार अनन्या पांडे आणि प्राजक्ता कोळी उर्फ मोस्टली साने, कुशा कपिला, फंचो, उओर्फी, विराज घेलानी, विष्णू कौशल, बी यूनिक, डॉली सिंग, अंकुश बहुगाना, साक्षी शिवदासानी, रोहन जोशी, काम भारी यांसारख्या १५० हुन अधीकी निर्मात्यांसोबत या क्रिएटर फॅन फेस्टची दुसर एडिशन साजरं होणार तुम्हाला आवडत्या क्रिएटरसोबत ‘मीट अँड ग्रीट’ संधीही मिळणार आहे.
या महोत्सवात युंग राजा, सुमुखी, यशराज मुखाटे, एमजे५, अनाम दरबार, आणि इतर अनेक क्रिएटर लाईव्ह परफॉमन्स करणार आहे. शिवाय, 'सोशल नेशन अकादमी' सोबत सोशल मीडियाच्या जगात खोलवर जाऊ शकता. तुम्ही पॉडकास्ट गुरू ऋतुराज सिंग यांच्या पॉडकास्ट पोटेंशिअल सारख्या मनोरंजक आणि माहितीपूर्ण मास्टरक्लासमध्ये सहभागी होऊ शकतात. निखिल नेरकर, स्ट्रॅटेजिक पार्टनर मॅनेजर, यूट्यूब इंडिया पार्टनरशिप आणि कृष्णा महतानी, स्ट्रॅटेजिक पार्टनर मॅनेजर, यूट्यूब इंडिया यांचे युट्युब शॉर्ट्स अनलॉक करणे, आणि रोक्सन चिनॉय, टॅलेंट पार्टनरशिप, स्नॅपचॅट इंडिया यांनी स्नॅपचॅटवर कसे तयार करावे, वाढावे आणि कमाई कशी करावी यावर वर्कशॉप घेणार आहेत.
तुम्हालाही सोशल नेशनला भेट द्यायायची असेल तर हे महत्त्वपूर्ण डिटेल्स जाणून घ्या.
तारीख: २० आणि २१ एप्रिल २०२४
वेळ: दुपारी १२.०० ते रात्री १०.००
स्थळ: जिओ गार्डन बीकेसी, मुंबई
तिकिटे: ५९९ पासून सुरू
बुकिंग कुठे करायचे?: Zomato ॲपवर लाइव्ह टॅब
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. )
संबंधित बातम्या