Saudi Travel Tips: सौदीमध्‍ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Saudi Travel Tips: सौदीमध्‍ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Saudi Travel Tips: सौदीमध्‍ये फिरायला जायचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Apr 19, 2024 02:32 PM IST

Travel Tips: तुम्ही यंदाच्या सुट्टीमध्ये दुसऱ्या देशात फिरायला जायचाप्लॅन करत असाल तर सौदी हा एक उत्तम पर्याय आहे.

Planning to travel to Saudi Know these important things
Planning to travel to Saudi Know these important things

Foreign Trip: तुम्‍ही उन्‍हाळ्यामध्‍ये सुट्टीचा आनंद घेण्‍यासोबत संस्‍कृती, साहस आणि निसर्गरम्‍य सौंदर्याचा अनुभव घेण्‍यासाठी नियोजन करत आहात का? तर मग सौदी योग्य डेस्टिनेशन आहे. या देशामध्‍ये आकर्षक समुद्रकिनारे व पर्वतरांगांपासून रोमांचक साहसी कृत्‍ये व कुटुंबासोबत धमाल ट्रिपचा आनंद घेण्‍यापर्यंत सर्वकाही आहे. तुमच्‍या बकेट लिस्‍टमध्‍ये सौदीची भर करू इच्छिता? तर मग या देशातील साहसी कृत्‍ये व धमाल पर्यटनाचा अनुभव देणाऱ्या गोष्‍टींबाबत थोडसे जाणून घेऊया.

कसा करावा प्रवास?

सौदीला पोहोचायला ५ तास लागतात. इंडिगो, विस्तारा, फ्लायनास, सौदीया यासह दोन देशांदरम्यान उड्डाण करणाऱ्या १२ एअरलाइन्समधून निवड करता येऊ शकते. तुम्ही वैध यूएस किंवा शेंजेन व्हिसा असलेले भारतीय असल्यास या देशामध्‍ये आगमन झाल्‍यानंतर तुमचा सौदी व्हिसा मिळवू शकता. इतर लोक भारतातील १० व्‍हीएफएस तशील कार्यालयांमध्‍ये ई-व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

भेट दिलीच पाहिजे असे डेस्टिनेशन

रियाध

सौदीची राजधानी रियाध हे उंच उंच गगनचुंबी इमारती आणि हेरिटेज इमारती असलेले एक गजबजलेले शहर आहे. या शहराची अनोखी संस्कृती आणि इतिहास अनुभवण्यात स्वारस्य असलेल्या व्‍यक्‍तींनी १५० वर्ष जुना अल मस्माक पॅलेस नक्‍की पाहिला पाहिजे. हा सुंदर राजवाडा १४व्या शतकात बांधण्यात आला आणि सौदीच्या अद्वितीय इतिहासाचे व संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो. तुम्हाला उंच गगनचुंबी इमारती पाहण्‍याची आवड असेल तर किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्टला नक्‍की भेट द्या.

तुम्ही रियाधपासून ३० मिनिटांच्‍या अंतरावर असलेले उपनगर दिरिया येथे जाऊ शकता, जेथे तुम्हाला सौदीमधील जुन्या रस्त्यांसह ऐतिहासिक स्‍मारके आणि वाडी हनीफासह नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल. सौदीचे पहिले युनेस्को जागतिक वारसा स्थळ हेग्रामधील प्रतिष्ठित पाककलेचे ठिकाण बुजैरी टेरेस येथे स्‍वादिष्‍ट पाककलांचा आस्‍वाद घेऊ शकता.

अलउला

सौदीमधील ऐतिहासिक वारसा लाभलेले अलउला हे आणखी एक सर्वोत्तम पर्यटन स्‍थळ आहे, जे तुम्‍हाला संस्‍कृती व इतिहासामध्‍ये खोलवर सामावलेल्‍या लक्षवेधक वास्‍तुकलांसह ७००० वर्षांपूर्वीच्‍या काळात घेऊन जाते. हेग्रा व एलिफंट रॉक येथे हॉट एअर बलूनिंगपासून स्‍टारगेझिंग व ग्‍लॅम्पिंग अनुभवांपर्यंत अलउला हे अद्भुत पर्यटनाचा अनुभव देणारे ओपन-एअर म्‍युझियम आहे.

२४ एप्रिलपासून सुरू होणारा अलउला कॅमल कप हा वास्‍‍तविकत: प्रेक्षकांसाठी खेळ आहे. तुम्‍ही येथे अनेक दिवस प्रांतांतील सर्वात जुना खेळ म्‍हणजेच उत्‍साहवर्धक उंटांच्‍या शर्यतींचा आनंद घेऊ शकता.

जेदाह आणि लाल समुद्र

लक्षवेधक बंदर शहर जेद्दाह लाल समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. जेद्दाहमध्ये जोडप्यांना आणि कुटुंबांना एकत्रित पर्यटनाचा आनंद घेण्‍यासाठी बरेच काही आहे. तुम्‍हाला कारंजे पाहायला आवडत असतील तर जेदाह कॉर्निश येथे जगातील सर्वात मोठे कारंजे किंग फह फाऊंटेन पाहू शकता. हे फाऊंटेन मुलांना व प्रौढ व्‍यक्‍तींना लक्षवेधक लाइट व साऊंड शोचा देखील आनंद देते.

जेद्दाहपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर लाल समुद्रातील आलिशान बेटे आहेत. सौदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे लक्झरी पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्हाला जगातील चौथ्या क्रमांकाची बॅरियर रीफ सिस्टीम, प्राचीन समुद्रकिनारे आणि घाटी, पर्वत व खारफुटी पाहायला मिळतील. शोध घेण्याची प्रतीक्षा आहे. तुम्ही फ्लायबोर्डिंग, स्नॉर्केलिंग, स्कूबा-डायव्हिंग, कयाकिंग आणि याचिंग यांचा आनंद घेऊ शकता.

ही ठिकाण आवर्जून बघा

सौदीतील स्कायडाइव्हः सौदी आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वात लोकप्रिय आणि कदाचित सर्वात लोकप्रिय क्रीडांपैकी एक स्कायडायव्हिंग आहे. फ्री-फॉल ४५ किंवा ५० सेकंदांपासून सुरू होते, पॅराशूट उघडल्यानंतर तीन ते पाच मिनिटे ग्‍लाइडिंगला सुरूवात होते. जेदाह हे समुद्र आणि निसर्गरम्‍य सौंदर्यासह स्कायडाइव्हसाठी अत्‍यंत लोकप्रिय ठिकाण आहे, तर अल मदिना आणि रियाधमध्ये पॅराशूटिंगचा आनंद घेता येतो.

सौदीमधील पर्वतरांगा: तुम्‍हाला पर्वतरांगांमध्‍ये पर्यटनाचा आनंद घेण्‍याची आवड असेल तर ताबूकच्या वायव्येकडील पर्वतरांगांवर जा. येथे हायकिंग, कॅम्पिंग आणि स्लेडिंगसह इतर विविध हंगामी क्रियाकलापांचा आनंद मिळतो. या प्रांतामध्‍ये विविध पर्वतरांगांचा अनुभव मिळतो, तसेच बर्फाच्‍छादित प्रदेशामध्‍ये पर्यटनाचा आनंद घेण्‍याची आवड असणारे जबल अल लॉजमध्‍ये या अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. जबल अल लॉजचा अरेबिक अर्थ 'आल्‍मंड माऊंटेन' असा आहे.

सौदी हे वर्षभर पर्यटनाचा आनंद देणारे डेस्टिनेशन आहे, जेथे पर्यटनाचा अद्वितीय अनुभव मिळतो. पर्वतरांगांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत या पर्यटन स्‍थळामध्‍ये धमाल आनंदासाठी सर्वकाही आहे.

Whats_app_banner