मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Aloe Vera : ‘अशाप्रकारे’ वापरा कोरफडीचा गर, तुम्हाला मिळेल चमकदार त्वचा!

Aloe Vera : ‘अशाप्रकारे’ वापरा कोरफडीचा गर, तुम्हाला मिळेल चमकदार त्वचा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 06, 2023 10:18 AM IST

Skin Care: हिवाळ्यात विशेषतः थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत, स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते.

स्किन केअर
स्किन केअर (freepik)

हिवाळ्यात त्वचेची दिनचर्या अर्थात स्किन केअर पाळल नाही तर तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते. प्रत्येक नवीन व्यक्तीसाठी चेहरा ही त्याची पहिली ओळख असते. अशा परिस्थितीत जर चेहऱ्याचा रंग निखळला तर तुमचे व्यक्तिमत्वही फिके पडते. हिवाळ्यात विशेषतः थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या स्किनला मॉइश्चरायझ करेल असे उत्पादन वापरावे. स्किनकेअरसाठी कोरफडीचा गर हा एक चांगला घटक असू शकतो. चला जाणून घेऊया कोरफडीचा वापर कसा केला जाऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

कोरफडीचा कसा वापर करू शकतात?

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ताज्या कोरफडीसोबत काकडी आणि मध वापरू शकता. या तिन्हींच्या मिश्रणाचा वापर तुमच्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. या मिश्रणाने तुमची त्वचा हायड्रेटेड होईल आणि चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळेल. हे मिश्रण तुम्ही २० मिनिटे चेहऱ्यावर लावू शकता. यानंतर, आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता.

तेलकट त्वचेसाठी कसा करायचा वापर?

तुमची त्वचा तेलकट असली तरी कोरफडीचा वापर तुमच्या सर्व समस्यांवर उपाय ठरेल. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही मध आणि काकडीच्या ऐवजी कोरफडच्या जेलमध्ये टी थ्री ऑईल टाकून वापरू शकता. चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी या दोन गोष्टींचा वापर प्रभावी ठरतो.

याशिवाय मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. या मिश्रणाचा वापर मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवू शकता.

WhatsApp channel

विभाग