मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Newborn Safety Tips: दिवाळी सेलिब्रेशनमध्ये नवजात बाळाला त्रास देऊ शकतात या चुका, तुम्ही तर करत नाही ना?

Newborn Safety Tips: दिवाळी सेलिब्रेशनमध्ये नवजात बाळाला त्रास देऊ शकतात या चुका, तुम्ही तर करत नाही ना?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 06, 2023 11:34 PM IST

Diwali Safety Tips For Newborn Baby: घरात नवजात बाळ असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीचा उत्साह साजरा करायचा असेल तर या ५ चुका टाळा.

दिवाळीत नवजात बाळाच्या सुरक्षिततेसाठी टिप्स
दिवाळीत नवजात बाळाच्या सुरक्षिततेसाठी टिप्स (unsplash)

Diwali Safety Tips For Newborn Baby: दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. वर्षभर लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण या सणाचा आनंद काहीसा विरून जातो जेव्हा तुम्ही घरातील नवजात बाळाच्या काळजीशी संबंधित या ५ चुका करता. चला जाणून घेऊया दिवाळीच्या उत्सवात नवजात बाळाला कोणत्या ५ चुका त्रास देऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

नवजात बाळाला वेळेवर स्तनपान करा

दिवाळीच्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत महिलांना त्यांच्या नवजात बाळाकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याचे अनेकदा दिसून येते. अशा स्थितीत अनेक वेळा माता मुलाला भूक लागल्यावर बाटलीतून दूध देते. त्यामुळे तो आजारी पडण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत बाळाच्या आरोग्याशी तडजोड न करता आपल्या बाळाच्या स्तनपानाचे रुटीन चुकवू नका.

फुलांमुळे अडचणी येऊ शकतात

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या आतही सजावट करण्यासाठी अनेक प्रकारच्या फुलांचा वापर केला जातो. परंतु हे करत असताना बहुतेक लोक हे विसरतात की अनेक फुले अशी असतात ज्यामुळे एलर्जी होऊ शकते. याशिवाय ही फुले फिव्हर आणि दमा सारख्या समस्यांना कारणीभूत ठरतात. तुमच्या नवजात बाळाला अशा कोणत्याही समस्यांपासून वाचवण्यासाठी फुलांना घरात आणण्यापूर्वी पाण्याने फवारणी करा.

खोलीत एकटे सोडू नका

दिवाळीच्या निमित्ताने घरात पाहुणे आणि शेजाऱ्यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत त्या लोकांसोबत भेटण्यासाठी आपल्या बाळाला खोलीत एकटे सोडण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने तुमच्या नवजात बाळाला अंथरुणात एकटे पाहून अस्वस्थ वाटू शकते. अनेक वेळा बाळाला त्याच्या सभोवतालचे नवीन चेहरे पाहून अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटते आणि ते चिडचिड करते. म्हणून आपल्या बाळाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा.

नवजात बाळाला बाहेर नेऊ नका

जर तुमच्या घरात नवजात मूल असेल तर त्यांच्यासमोर कधीही मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नका. नवजात बालकाचे कान अतिशय संवेदनशील असतात आणि त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर मोठ्या आवाजामुळे परिणाम होऊ शकतो. त्यांना घराबाहेर न काढणे हे सर्वात उत्तम आहे. तसेच बाळाचे कान टोपी, कापसाचा गोळा किंवा स्कार्फने झाकून त्यांचे चांगले संरक्षण करा.

 

फटाक्यांऐवजी फुलझडी लावा

जर तुमच्या घरात नवजात बाळ असेल तर त्याच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही मोठ्या आवाजाचे फटाके जाळणे टाळणे फार महत्वाचे आहे. फटाक्यांमुळे लहान मुलांना भाजण्याचा आणि इजा होण्याचा धोका असतो. फटाक्यांऐवजी फुलझडी लावा. पण शक्यतो फटाके पूर्णपणे टाळा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग