मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Akshay Tritiya Recipe: अक्षय तृतीयेला खीर बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक, मिळेल देसी चव

Akshay Tritiya Recipe: अक्षय तृतीयेला खीर बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक, मिळेल देसी चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 21, 2023 01:54 PM IST

Cooking Tricks: अक्षय तृतीयेला तांदळाच्या खीरचे महत्त्व असते. घट्ट आणि टेस्टी खीर बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करु शकता. याने आजीच्या हातची चव मिळेल.

खीर टेस्टी बनवण्यासाठी ट्रिक
खीर टेस्टी बनवण्यासाठी ट्रिक

Tips to Make Thick and Tasty Kheer: खीर ही एक डिश आहे जी बहुतेक वेळा सणांच्या वेळी बनविली जाते. अक्षय तृतीयेला खीरचे विशेष महत्त्व असते. अनेक वेळा महिला तक्रार करतात की खीरला ती देसी चव येत नाही. आजीच्या हाताने बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. अशा परिस्थितीत त्यांच्या हाताने बनवलेल्या खीरची गोष्ट सुद्धा वेगळीच असते. जे खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावे असे वाटते. तुम्ही बनवलेल्या खीरमध्ये जर तुम्हाला ती देसी चव दिसत नसेल तर तुम्ही आजींची ही ट्रिक फॉलो करू शकता.

Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

सोपी आहे ही ट्रिक

खीर बनवण्याची ही सोपी ट्रिक तुम्ही देखील वापरून पाहू शकता. ज्यामध्ये तुम्हाला फुल क्रीम दूध घ्यायचे आहे. फुल क्रीम दुधाने बनवलेल्या खीरची चव वेगळी असते. आता आजीची ट्रिक म्हणजे हे दूध नीट उकळून घ्या. जोपर्यंत दूध साधारण १ लिटरवरून अर्धा लिटरपर्यंत होत नाही तोपर्यंत उकळा. त्यानंतरच त्यात तुमचे बाकी गोष्टी घाला. दुधाला नीट उकळून खीर बनवल्यास त्याची चव अगदी त्या देसी खीरसारखीच लागते.

Cooking Tips: भेंडीची भाजी चिकट होते? या टिप्स फॉलो केल्याने होईल क्रिस्पी

कंडेन्स्ड मिल्कचा वापर

आजीची ट्रिक फॉलो केल्यानंतर तुम्हाला याची गरज नाही. पण तरीही क्रिमी टेक्सचर आणि कमी गोड खीर खायला आवडत असेल तर त्यात तुम्ही थोडे कंडेन्स्ड मिल्क वापरू शकता. त्यामुळे चवही चांगली मिळते.

Bread Roll Recipe: झटपट बनवा रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल, संध्याकाळसाठी आहे परफेक्ट स्नॅक्स

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला तांदळाच्या खीरची चव चांगली हवी असेल तर तांदूळ नेहमी तुपात भाजून घ्या आणि नंतर खीरमध्ये घाला. यासोबतच खीरसाठी कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरला जाऊ शकतो. यामुळे खीर घट्ट होते, जिची चव अप्रतिम लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel