मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: भेंडीची भाजी चिकट होते? या टिप्स फॉलो केल्याने होईल क्रिस्पी

Cooking Tips: भेंडीची भाजी चिकट होते? या टिप्स फॉलो केल्याने होईल क्रिस्पी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 19, 2023 10:23 PM IST

Stickiness of Lady Finger: भेंडी नेहमी चिकटपणा सोडते आणि मुलांना ती खायला आवडत नाही. त्यामुळे यावेळी भिंडीची भाजी बनवताना धुण्यापासून ते शिजवण्यापर्यंतच्या या टिप्स फॉलो करा.

भेंडीच्या भाजीचा चिकटपणा कमी करण्यासाठी कुकिंग टिप्स
भेंडीच्या भाजीचा चिकटपणा कमी करण्यासाठी कुकिंग टिप्स

Tips to Remove Stickiness From Okra: अनेकांना भेंडीची भाजी आवडत नाही कारण ती चिकट असते. भेंडीची भाजी नेहमी चिकट होत असेल तर या छोट्या ट्रिक्स फॉलो करा. ज्याचा अवलंब केल्याने भेंडी एकदम कुरकुरीत आणि मोकळी होईल. अशी ही क्रिस्पी भाजी सगळेच जण आनंदाने संपवतील. एवढेच नाही तर अशा प्रकारे तयार केलेली भाजी मुलांनाही आवडेल. चला तर मग जाणून घेऊया भेंडी भाजीचा चिकटपणा कसा कमी करावा.

ट्रेंडिंग न्यूज

घरच्या घरी तंदूरी नान बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, रेस्टॉरंटसारखी होईल सॉफ्ट

भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी कुकिंग टिप्स

भेंडी धुतल्यानंतर वाळवावी

भेंडी धुतल्यानंतर लगेच कापू नये. नेहमी भेंडीवरील ओलावा कोरडा करावा. भेंडी धुतल्यानंतर कपड्याने पाणी चांगले कोरडे करा. शक्य असल्यास भेंडी साधारण एक ते दोन तास आधी धुवून ठेवावी. जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. अन्यथा हे पाणी भेंडीमध्ये मिसळल्याने ते जास्त चिकट होईल.

भेंडीचे मोठे तुकडे कापा

भेंडी कापताना छोटे तुकडे करु नका. नेहमी मोठे तुकडे करा. जेणेकरून भेंडीतून चिकटपणा कमी येतो.

तेलात तळणे

भेंडीचे मोठे तुकडे तेलात तळल्याने भेंडीचा श्लेष्मा सुकतो आणि ते कुरकुरीत होते.

Cooking Tips: पुरीमध्ये तेल राहतं? ऑइल फ्री बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

आंबट पदार्थ टाका

भेंडीची भाजी बनवताना त्यात लिंबाचा रस किंवा दही घाला. जर तुम्ही भेंडीची कोरडी भाजी बनवत असाल तर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर टाकल्यास भेंडी कुरकुरीत होईल. दुसरीकडे, रस्सा भाजीसाठी दही किंवा चिंचेचे पाणी भेंडीचा चिकटपणा काढून टाकण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग