मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  घरच्या घरी तंदूरी नान बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, रेस्टॉरंटसारखी होईल सॉफ्ट

घरच्या घरी तंदूरी नान बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, रेस्टॉरंटसारखी होईल सॉफ्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 13, 2023 10:07 PM IST

Cooking Tips: हॉटेलसारखी सॉफ्ट तंदूरी नान बनवणे अनेकांना कठिण काम वाटते. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करुन ते बनवू शकता. पाहा -

तंदूरी नान
तंदूरी नान (unsplash)

Tandoori Naan Recipe: घरी तंदूरी नान बनवताना महिला अनेकदा तक्रार करतात की त्यांचे नान रेस्टॉरंटसारखे सॉफ्ट होते नाही. जेव्हा घरी नान बनवतात तेव्हा ते खाताना कडक होतात. जर तुमचीही नानबाबत अशीच तक्रार असेल तर आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तंदूरी रेस्टॉरंटसारखे नान बनवू शकता.

नानसाठी पीठ मळताना लक्षात ठेवा या गोष्टी

वेगवेगळ्या नानसाठी त्याचे पीठही वेगवेगळ्या प्रकारे मळले जाते. सामान्यतः तंदुरी नान बनविण्यासाठी मैदा वापरला जातो. परंतु तुम्ही त्यात गव्हाचे पीठ देखील घालू शकता. पिठात बेकिंग सोडा, मीठ सोबत १ चमचा बेसन घालणे देखील चांगले मानले जाते. रेस्टॉरंटसारखे नान बनवण्यासाठी त्यात खमीर पीठ देखील घाला. नान चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही कणकेत लसूण वापरू शकता.

नानचं पीठ कसं असावं

- नानचं पीठ पुरीच्या पिठासारखं कडक किंवा घट्ट नसून नेहमी मऊ मळलं जातं.

- मैदा किंवा पीठ सेट झाल्यावर हाताला थोडे तेल लावून पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे, जेणेकरून ते मऊ होईल. यानंतर वर सुती कापड ठेवा.

- नानसाठी पीठ मळताना कोमट पाणी वापरा. जर नान मऊ झाले तर तुम्ही त्यासाठी दूध देखील वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel