मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  बनवा होममेड शुगर फ्री जीरा बिस्कीट, चहा कॉफीचे परफेक्ट कॉम्बीनेशन

बनवा होममेड शुगर फ्री जीरा बिस्कीट, चहा कॉफीचे परफेक्ट कॉम्बीनेशन

Hiral Gawande HT Marathi
Apr 13, 2022 07:14 PM IST

बरेच जण सकाळची सुरूवात चहा आणि बिस्कीट खावून करतात. पण विचार करा जर तुम्ही रोज बिस्कीट खाणार तर तुमच्या शरीरात डबल साखर जाणार. चहा कॉफीसोबत परफेक्ट कॉम्बीनेशन पाहिजे तर घरीच बनवा शुगर फ्री जीरा बिस्कीट. कसे ते इथे वाचा.

जीरा बिस्कीट
जीरा बिस्कीट

सकाळी किंवा संध्याकाळी चहा आणि कॉफीसोबत काहीतरी खायला असेल तर मजाच वेगळी असते. पण रोज रोज विकतचे बिस्कीट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे तुम्ही जर होममेड बिस्कीट बनवायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही सांगतोय शुगर फ्री जीरा बिस्कीट. या बिस्कीट फक्त डायबिटीक पेशन्टसाठी चांगल्या नाहीत तर प्रत्येक जण हे खाऊन आपल्या शुगरची काळजी घेऊ शकतात. चला तर जाणून घेऊया तुमच्या चहा कॉफीचे परफेक्ट कॉम्बीनेशन असलेले शुगर फ्री जीरा बिस्कीट कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

साहित्यः

- १५० ग्रॅम मैदा

- ७५ ग्रॅम तूप

- १ लहान चमचा जीरे

- अर्धा कप दूध

- १ लहान कप किसलेले नारळ

- अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर

- गुळ

विधीः

एका बाऊल मध्ये मैदा गाळून घ्या. यात मीठ आणि बेकिंग पावडर मिक्स करा. हे तिन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर हे परत गाळून घ्यायचे लक्षात ठेवा. आता कढईमध्ये तूप घेऊन ते फेटत रहा. जेव्हा याचा टेक्सचर क्रीमी होईल तेव्हा आणखी तूप आणि गूळ टाकून मिक्स करा. आता यात थोडा मैदा आणि तूप टाकून पीठ मळून घ्या. हे मिक्सचर २० मिनीट झाकून ठेवून द्या. आता मायक्रोव्हेवची तयारी करा. मायक्रोव्हेवला १९० डिग्री सेल्सियस वर प्री- हिट करा. आता मळून ठेवलेल्या पीठाची एक जाड पोळी लाटून घ्या. हे बिस्कीटांच्या आकारात कापून वेगवेगळे ठेवा. आता हे मायक्रोव्हेव ट्रे मध्ये सेट करा. हे मायक्रोव्हेव किंवा ओव्हन मध्ये ठेवून १९० डिग्री सेल्सियसवर २५ मिनीटांपर्यंत बेक करा. यानंतर बिस्कीट लगेच काढू नका. त्यांना १० ते १५ मिनीट सेट होऊ द्या. नंतर ट्रे काढून घ्या. तुमच्या जीरा बिस्कीट तयार आहेत. आता गरमा गरम चहा किंवा कॉफी सोबत हे बिस्कीट सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग