मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Soya Chunks Cutlets: नाश्त्यात बनवा सोया चंक्सपासून कटलेट, नोट करा टेस्टी आणि आरोग्यदायी रेसिपी!

Soya Chunks Cutlets: नाश्त्यात बनवा सोया चंक्सपासून कटलेट, नोट करा टेस्टी आणि आरोग्यदायी रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 20, 2024 10:36 AM IST

Breakfast Recipe: सोया चंक्स हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध अन्नपदार्थ आहे, विशेषत: शाकाहारी लोकांसाठी कारण त्यामध्ये प्रथिने चांगली असतात.

how to make Soya Chunks Cutlets
how to make Soya Chunks Cutlets (freepik)

Healthy Snacks or Breakfast Recipe: रोज नाश्ता करणे गरजेचे आहे. आठवड्याभर तेच रेगुलर पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा असेल. आता विकेंडला तुम्हाला काही तरी वेगळं खावंसं वाटतं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फक्त टेस्टीच नाही तर हेल्दी सुद्धा आहे. आपण विकेंडला नाश्ताला बनवा सोया चंक्सचे कटलेट. सोया चंक्स किंवा न्यूट्रिएला बद्दल असे म्हटले जाते की शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय आहे, परंतु बर्याच लोकांना त्याची चव आवडत नाही, ज्यामुळे निरोगी असूनही लोकांच्या आहारात त्याचा समावेश केला जात नाही.पण, आहारात त्याचा समावेश करण्यासाठी कमी पर्याय आहेत. पण तुम्ही आता सोयाचे कटलेट बनवून खाऊ शकता. खायला चविष्ट असण्यासोबतच ते बनवायलाही खूप कमी वेळ लागतो, चला तर मग जाणून घेऊया या रेसिपीबद्दल.

ट्रेंडिंग न्यूज

लागणारे साहित्य

सोया चंक्स १ कप, कांदा १, बटाटा उकडलेला आणि मॅश केलेला - १ कप, लाल मिरची पावडर - १/२ टीस्पून, गरम मसाला पावडर - १/२ टीस्पून, कोथिंबीर - २ चमचे, तेल - ३ चमचे मीठ चवीनुसार, ४ चमचे ब्रेडक्रंब, थोडे ओट्स पावडर

Cold Coffee Recipe: मलईदार, फेसाळलेली कोल्ड कॉफी मशीनशिवाय घरीच बनवा, नोट करा रेसिपी!

जाणून घ्या कृती

> कटलेट बनवण्यासाठी प्रथम सोयाचे तुकडे कुकरला टाकून १ शिट्टी वाजवा. त्यातून येणारा वास दूर करण्यासाठी तीन ते चार वेळा पाण्याने नीट धुवा.

> कुकरमधला गॅस स्वतःच जाऊ द्या मग कुकर उघडा. मग त्यातून पाणी पिळून घ्या आणि त्यातील सर्व पाणी काढून मऊसरच्या मदतीने हाताने मॅश करा.

Egg Paratha Recipe: रेगुलर पराठ्याऐवजी नाश्त्यात बनवा अंड्याचा पराठा, नोट करा रेसिपी!

> आता एका भांड्यात उकडलेले, मॅश केलेले बटाटे घाला. नंतर त्यात सोया चंक्स, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल मिरची, गरम मसाला पावडर,  आवश्यकतेनुसार मीठ घालून सर्वकाही मिक्स करा.

> मिश्रण मंद आचेवर ३ ते ५ मिनिटे तळून घ्या.

> ब्रेडक्रंब थोडे ओट्स आणि पाण्यात मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा.

> आता सोया मिश्रणाचे छोटे गोळे करून थोडेसे चपटे करा.

Dudhi Bhopla Recipe: दुधी भोपळ्याचा रायता ठेवतो पोट थंड, जेवणासाठी आवर्जून बनवा!

> ब्रेडक्रंब-ओट्सच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात तळून घ्या.

> शिवाय, तुम्ही नॉन-स्टिक पॅनमध्ये हलके तेल घालून शॅलो फ्राय देखील करू शकता.

 

WhatsApp channel