मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Ice Cream: डेझर्ट मध्ये बनवा नो कुकिंग मँगो आईस्क्रीम, उन्हाळ्यासाठी आहे बेस्ट रेसिपी

Mango Ice Cream: डेझर्ट मध्ये बनवा नो कुकिंग मँगो आईस्क्रीम, उन्हाळ्यासाठी आहे बेस्ट रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 30, 2023 09:40 PM IST

No Cooking Ice Cream: उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आईस्क्रीम या दोन्ही गोष्टी आवडीने खाल्ले जातात. तुम्ही डेझर्टमध्ये या दोन्ही गोष्टींपासून मँगो आईस्क्रीम बनवू शकता. पहा ही झटपट होणारी रेसिपी.

मँगो आईस्क्रीम
मँगो आईस्क्रीम

Instant Mango Ice Cream Recipe: व्हिडिओ पाहून आईस्क्रीम बनवताना तर ते एकदम सोपे वाटतात. पण जेव्हा तुम्ही ती करून टेस्ट करता तेव्हा कळते की ती मार्केटमध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीम सारखी नाहीये. तुमच्या सोबत पण असे काही झाले असेल तर काळजी करू नका. आम्ही सांगतोय आईस्क्रीम बनवण्याची सोपी पद्धत, ज्याने तुम्हाला दुध आटवत बसावे लागणार आहे. तसेच बाजारातून महागड्या गोष्टी सुद्धा लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही नो कुकिंग इंस्टंट मँगो आईस्क्रीम बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Evening Snacks साठी परफेक्ट आहे ब्रेड एग रोल, नोट करा अप्रतिम रेसिपी

मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य

- १ आंबा

- साखर

- २ चमचे मिल्क पावडर

- अर्धा ग्लास दुध

- ४ चमचे दुधाची साय

- कंडेन्स मिल्क

- व्हॅनिला इसेंस

Idli Recipe: नाश्त्यात मॅकरोनी इडलीने बनवा रविवार खास, खूप सोपी आहे ही रेसिपी

मँगो आईस्क्रीम बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम आंब्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात चार चमचे दुधाची साय, दोन चमचे मिल्क पावडर, अर्धा ग्लास दुध आणि चवीनुसार साखर टाकून ते सर्व नीट ब्लेंड करून घ्या. आंबा आणि मिल्क पावडर हे गोड असल्यामुळे यात जास्त साखर टाकू नका, हे लक्षात ठेवा. तुम्ही साखरच्या ऐवजी कंडेन्स मिल्क सुद्धा टाकू शकता. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. आता हे आईस्क्रीम सेटिंग मोल्डमध्ये टाका. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात वरून आंब्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता. यामुळे ते आणखी टेस्टी लागेल. यात ड्राय फ्रूट्स टाकू नका. यामुळे आंब्याची चव कमी होऊन ते वेगळे लागू शकते. 

Crispy Corn: संध्याकाळच्या चहासोबत बनवा रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न, मिनिटात होईल तयार

शेवटी व्हॅनिला इसेंस टाकून हे फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्ही हे ५ ते ६ तास किंवा रात्रभर ठेवू शकता. आईस्क्रीम सेट झाल्यानंतर थंड थंड सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग