मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Idli Recipe: नाश्त्यात मॅकरोनी इडलीने बनवा रविवार खास, खूप सोपी आहे ही रेसिपी

Idli Recipe: नाश्त्यात मॅकरोनी इडलीने बनवा रविवार खास, खूप सोपी आहे ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 30, 2023 09:42 AM IST

Sunday Special Breakfast: खायला चविष्ट असण्यासोबतच मॅकरोनी इडली बनवायलाही खूप सोपी आहे. सुट्टीचा दिवस खास करण्यासाठी तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये ही रेसिपी ट्राय करु शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे बनावयचे.

मॅकरोनी इडली
मॅकरोनी इडली

Macaroni Idli Recipe: जर तुम्हाला इटालियन आणि दक्षिण भारतीय पदार्थ खाण्याची आवड असेल तर ही कॉम्बो डिश मॅकरोनी इडली तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यास मदत करू शकते. खायला चविष्ट असण्यासोबतच मॅकरोनी इडली बनवायलाही खूप सोपी आहे. सकाळच्या नाश्त्याप्रमाणेच तुम्ही संध्याकाळी तुमची भूक भागवण्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया मॅकरोनी इडलीची ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

- ४ चमचे मॅकरोनी

- १ बारीक चिरलेला कांदा

- १ चिरलेली शिमला मिरची

- १ चिरलेला टोमॅटो

- २ हिरवी मिरची

- कोथिंबीर

- अर्धा टीस्पून लाल तिखट

- तेल २ टीस्पून

- चिमूटभर हिंग

- १ टीस्पून जिरे

- चवीनुसार मीठ

Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत

मॅकरोनी इडली बनवण्याची पद्धत

मॅकरोनी इडली बनवण्यासाठी प्रथम इडली लहान तुकडे करून एका भांड्यात ठेवा. यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे, चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो घालून थोडा वेळ कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात मीठ, लाल तिखट, मॅकरोनी आणि इडली घालून मिक्स करा. तुमची चवदार मॅकरोनी इडली नाश्त्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel

विभाग