मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Evening Snacks साठी परफेक्ट आहे ब्रेड एग रोल, नोट करा अप्रतिम रेसिपी

Evening Snacks साठी परफेक्ट आहे ब्रेड एग रोल, नोट करा अप्रतिम रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 30, 2023 07:29 PM IST

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा एग ब्रेड रोल. ते तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही आणि काही मिनिटांत तयार होतात.

ब्रेड एग रोल,
ब्रेड एग रोल,

Bread Egg Roll Recipe: रविवार असेल तर प्रत्येकाच्या घरात काहीतरी खास खाण्याची मागणी असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आवडेल आणि पूर्वतयारी शिवाय बनवता येईल असे काहीतरी बनवणे तुमच्यासाठी अवघड होऊन बसते. अशा वेळी ब्रेड एग रोल ही परफेक्ट रेसिपी आहे. जे तुम्ही पूर्वतयारी शिवाय तयार करू शकता आणि ते सुद्धा अगदी कमी वेळात. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचे चटपटीत ब्रेड ब्रेड रोल्स.

ट्रेंडिंग न्यूज

- ब्रेड स्लाईस

- ३ उकडलेले बटाटे

- बारीक चिरलेले कांदे

- ताजी कोथिंबीर

- २-३ हिरव्या मिरच्या

- ९-१० पाकळ्या लसूण

- २ इंच लांब आल्याचा तुकडा

- सुकी लाल मिरची

- अर्धा चमचा मीठ

- १ टीस्पून मोहरी

- हिंग चिमूटभर

- जिरे

- धणे

- कढीपत्ता

- हळद

- मीठ चवीनुसार

Crispy Corn: संध्याकाळच्या चहासोबत बनवा रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न, मिनिटात होईल तयार

ब्रेड एग रोल बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम अंडी उकळवून ठेवा.

- आता लसूण, आले, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

- कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर मोहरी घाला. धणे आणि हिंग घाला.

- कढीपत्ता, हळद घालून मिक्स करा.

- मीठ घालून त्यात लसूण,आलं आणि मिरची पेस्ट घालून मिक्स करा.

Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत

- कांदा बारीक चिरून उकडलेल्या बटाट्यात मिक्स करा.

- बटाटे चांगले मॅश करा आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

- तडका दिलेले मसाले मिक्स करा. मीठ घाला आणि हाताच्या मदतीने चांगले मॅश करा.

- आता ब्रेडच्या स्लाइसच्या ब्राऊन कडा काढा आणि पाण्यात बुडवून घ्या आणि तळहातावर ठेवून पाणी पिळून घ्या.

- ब्रेडच्या वर अर्धे अंडे ठेवा आणि सोबत बटाट्याचे मिश्रण ठेवा आणि बोटांच्या मदतीने चांगले पॅक करा.

- कुरकुरीत आणि चटपटीत एग ब्रेड रोल तयार आहेत. चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग