मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Chutney: उन्हाळ्यात फक्त चव नाही तर आरोग्यासाठीही बेस्ट आहे कैरीची चटणी, अशी बनवा

Summer Special Chutney: उन्हाळ्यात फक्त चव नाही तर आरोग्यासाठीही बेस्ट आहे कैरीची चटणी, अशी बनवा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 27, 2023 01:41 PM IST

Kairichi Chutney: उन्हाळ्याच जेवणात चव आणि आरोग्य दोन्ही हवे असेल तर कैरीच्या चटणीची ही रेसिपी ट्राय करा. कशी बनवायची ते जाणून घ्या.

कैरीची चटणी
कैरीची चटणी (freepik)

Raw Mango Chutney Recipe: उन्हाळा सुरू होताच माणसाची भूक कमी होते. तहान शमवण्यासाठी सतत पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. अशा वेळी कैरीची चटणी जेवणासोबत दिल्यास तोंडाची चव आणि भूक दोन्हीही दूर होतात. कच्च्या कैरीची चटणी ही खाण्यास अतिशय चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असते. या उन्हाळ्यातील खास चटणी पोटाच्या अनेक समस्या दूर करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. चला तर मग या उन्हाळ्यात कच्च्या कैरीच्या चटणीचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी फॉलो करूया.

- २०० ग्रॅम कोथिंबीर

- ५-६ हिरव्या मिरच्या

- ७-८ पाकळ्या लसूण

- १/२ टीस्पून भाजलेले जिरे

- २ खोबऱ्याचे तुकडे

- १ टीस्पून लिंबाचा रस

- १ टीस्पून साखर

- चवीनुसार मीठ

- आवश्यकतेनुसार पाणी

Summer Special Drink: या उन्हाळ्यात ट्राय करा अननस पन्ह्याची ही रेसिपी, टेस्ट सोबत मिळेल एनर्जी

कच्च्या कैरीची चटणी बनवण्याची पद्धत

कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी प्रथम कैरी स्वच्छ धुवा आणि सुती कापडाने पुसून घ्या. आता कैरी सोलून त्याचे छोटे तुकडे करा. यानंतर धुतलेल्या कोथिंबीर चिरून घ्या. आता मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या, लसणाचे तुकडे आणि कैरीचे तुकडे, कोथिंबीर टाकून बारीक करून घ्या. आता त्यात भाजलेले जिरे, नारळाचे तुकडे, १ चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून चटणी बारीक करा. आता पुन्हा एकदा मिक्सीचे झाकण उघडा आणि थोडे पाणी घालून चटणी पुन्हा बारीक वाटून घ्या. आता एका भांड्यात चटणी काढा आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel