मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Snacks Recipe: मुलांसाठी स्नॅक्समध्ये बनवा टेस्टी पनीर चीज टोस्ट, झटपट तयार होते ही रेसिपी

Snacks Recipe: मुलांसाठी स्नॅक्समध्ये बनवा टेस्टी पनीर चीज टोस्ट, झटपट तयार होते ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 26, 2023 06:41 PM IST

Recipe for Kids: जेव्हा मुलांना अचानक भूक लागते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी टेस्टी पनीर चीज टोस्ट बनवू शकता. हा नाश्ता झटपट तयार करता येतो. ते कसे बनवायचे ते येथे पाहा.

पनीर चीज टोस्ट
पनीर चीज टोस्ट

Paneer Cheese Toast Recipe: वाढत्या वयात मुलांना वारंवार भूक लागते. अशा परिस्थितीत मुले प्रत्येक वेळी काहीतरी नवीन खाण्याची मागणी करतात. त्याचबरोबर आईसुद्धा मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. जर मुलांना संध्याकाळी भूक लागली असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी चविष्ट पनीर चीज टोस्ट तयार करू शकता. ते खूप लवकर तयार होतात आणि चव देखील अप्रतिम आहे. दुसरीकडे पनीर आणि चीज दोन्ही मुलांचे आवडते असतात, म्हणून ते देखील ही डिश मोठ्या आवडीने खातात. ते कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.

- चीज

- बटर

- ब्रेड स्लाइस

- कांदा

- शेजवान सॉस

- मेयोनिज

- काळी मिरी पावडर

- चिली फ्लेक्स

- ओरेगॅनो

- मीठ

Paneer Recipe: डिनरमध्ये बनवा आचारी पनीर, पराठा आणि नानसोबत वाढते लज्जत

कसे बनवावे

पनीर चीज टोस्ट बनवण्यासाठी प्रथम पनीरचे लहान चौकोनी तुकडे करा. यासोबतच कांदाही बारीक चिरून घ्या. आता एका बाऊलमध्ये कांदा आणि पनीर मिक्स करा. नंतर त्यात शेजवान सॉस आणि मेयोनिज मिक्स करा. त्यात मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि चीज घालून पुन्हा मिक्स करा. आता ब्रेड घ्या आणि त्यावर ही पेस्ट चांगली पसरवा. वरून किसलेले चीज घाला. 

Mango Pickle Recipe: कैरीचं कोरडं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

तव्यावर बटर लावून त्यावर ब्रेड स्लाईस ठेवा. झाकण ठेवून १ ते २ मिनिटे शिजवा. तुमची टेस्टी पनीर चीज टोस्ट तयार आहे.

WhatsApp channel

विभाग