अनेक लोकांना जैन पद्धतीचे जेवण आवडते. जैन धर्मात अनेक भाज्यांचा त्याग केला आहे. पण त्याऐवजी काही फळांपासून भाज्या बनवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला काही सिंपल जैन रेसिपी सांगणार आहोत, ज्या झटपट तयार होतील. आज महावीर जयंती निमित्त तुम्ही या स्पेशल जैन स्टाईल भाज्या तुमच्या डिनर मध्ये बनवू शकता.
काकडीची भाजीः काकडीची भाजी बनवण्यासाठी काकडी, टोमॅटो, जीरे, मीठ, हळद, धने पावडर, तिखट, चिंचेची आंबट गोट चटणी, गरम मसाला, हींग आणि कोंथिबीर एवढ्या गोष्टी लागतील.
विधीः ही भाजी बनवण्यासाठी काकडी सोलून चिरून घ्या. टोमॅटो सुद्धा कापून घ्या. आता एका कढाईत तेल गरम करून त्यात हींग आणि जिरे टाका. जिरे तडकल्यानंतर यात टोमॅटो टाकून मीठ, हळद, धने पावडर, तिखट टाका. शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाका. हे मसाले शिजल्यानंतर यात काकडीचे तुकडे टाका आणि त्यावर झाकण ठेवा. साधारण ७ ते १० मिनीटांमध्ये भाजी शिजेल. काकडीतून भरपूर पाणी सुटत असल्याने झाकण काढून ठेवा आणि थोडा वेळ तसेच शिजवा. पाणी सुकल्यानंतर त्यात गरम मसाला आणि चिंचेची आंबड गोड चटणी टाका. वरून कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा.
आंब्याची लुंजीः हे बनवण्यासाठी कैरी, जीरे, मीठ, हळद, धने पावडर, तिखट, गरम मसाला, मेथी दाणे, गुळ किंवा साखर हे सर्व साहित्य घ्या.
विधीः सर्वप्रथम कैऱ्या धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि मेथी दाणे टाका. ते नीट तडतडल्यानंतर त्यात मीठ, हळद, धने पावडर, तिखट टाकून नीट मिक्स करून घ्या. थोडेसे पाणी टाकून नंतर त्यात कैरीचे काप टाका आणि त्यावर झाकण ठेवा. थोड्या वेळाने जेव्हा कैरी शिजतील त्यानंतर त्यात गरम मसाला आणि गुळ टाका. नीट मिक्स करा आणि तुम्ही आंब्याची लुंजी तयार आहे.
केळाची भाजीः ही भाजी बनवण्यासाठी पिकलेले केळे, जीरे, मीठ, हळद, धने पावडर, तिखट, चिंचेची गोड आंबट चटणी आणि तुप हे साहित्य घ्या.
विधीः सर्वप्रथम केळे सोलून कापून घ्या. एका कढईत तूप गरम करा आणि त्यात जिरे टाका. त्यानंतर त्यात सर्व मसाले टाकून थोडेसे पाणी टाका. मसाले नीट शिजल्यानंतर त्यात केळाचे तुकडे टाका. सर्वात शेवटी चिंचेची आंबट गोड चटणी टाका. गरमा गरम पुरी किंवा पराठ्यांसोबत ही भाजी सर्व्ह करा.
भरलेली काकडीः ही भाजी बनवण्यासाठी काकडी, मीठ, हळद, धने पावडर, तिखट, चिंचेची आंबट गोड चटणी आणि सरसो तेल हे साहित्य घ्या.
विधीः सर्वप्रथम एका वाटीत सर्व मसाले घेऊन त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता काकडी धुवून घ्या आणि त्याचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घ्या. यात मध्ये हलके चीर देऊन त्यात हे मसाले भरा. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात काकडी टाका. झाकण ठेवून थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. साधारण ७ ते ८ मिनीटांनंतर तपासा. काकडी शिजल्यानंतर पाणी झाकण काढून सुकवून घ्या आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या