मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  नवरात्रीत बनवा फराळी आलू टिक्की, या रेसिपीने वाढवा उपवासाची लज्जत

नवरात्रीत बनवा फराळी आलू टिक्की, या रेसिपीने वाढवा उपवासाची लज्जत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 21, 2023 07:07 PM IST

Navratri Fast: ही टिक्की खायला तर खूप चविष्ट तर आहेच पण लवकर तयारही होते. या नवरात्रीत तुम्हीही तुमच्या उपवासाची लज्जत वाढवण्याची असेल तर ही आलू टिक्कीची रेसिपी ट्राय करा.

उपवासाची आलू टिक्की
उपवासाची आलू टिक्की (unsplash)

Falahari Aloo Tikki Recipe: नवरात्रीच्या उपवासाच्या फराळात बटाट्यापासून बनवलेल्या बहुतेक गोष्टी खाल्ल्या जातात. अशा वेळी जर तुम्हाला नवरात्रीच्या उपवासात नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाण्याचा कंटाळा येत असेल तर या चविष्ट उपवासाच्या बटाट्याच्या टिक्कीची ही रेसिपी ट्राय करा. ही टिक्की खायला खूप चवदार तर आहेच पण पटकन तयारही होते. जर तुम्हालाही या नवरात्रीत आपल्या तोंडाची चव बदलून नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर फलाहारी आलू टिक्की रेसिपी बनवा.

ट्रेंडिंग न्यूज

उपवासाची आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य

- ५ उकडलेले बटाटे

- १ वाटी दही

- १ वाटी डाळिंबाचे दाणे

- २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- १ ते १० काळी मिरी

- बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर

- बारीक चिरलेले आले

- १ टीस्पून जिरे पूड

- हिरवी चटणी आवश्यकतेनुसार

- चवीनुसार सैंधव मीठ

- तूप किंवा तेल गरजेनुसार

उपवासाची आलू टिक्की बनवण्याची पद्धत

उपवासाची आलू टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करावेत. आता या बटाट्यात मीठ, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, जिरे पूड घालून चांगले मिक्स करा. आता बटाट्याच्या मसाल्याला तळहाताच्या साहाय्याने गोल टिक्कीसारखा आकार द्या. त्यानंतर कढईवर तूप घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी टिक्की भाजून घ्यावी. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी तेल सुद्धा वापरू शकता. आता तयार केलेली टिक्की ताटात काढून त्यावर दही, डाळिंबाचे दाणे आणि हिरवी चटणी घालून गरमागरम सर्व्ह करा

WhatsApp channel

विभाग